शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला घ्यायला जात असलेला तरुण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:18 IST

जळगाव : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भाऊसाहेब प्रभाकर कोळी (३०, रा.चांदसर,ता. धरणगाव) ...

जळगाव : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भाऊसाहेब प्रभाकर कोळी (३०, रा.चांदसर,ता. धरणगाव) हा तरुण ठार झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर बांभोरीपासून काही अंतरावर असलेल्या मातोश्री ढाब्यासमोर झाला.भाऊसाहेब याची पत्नी मनिषा ही मुलांसह साकेगाव, ता.भुसावळ येथे माहेरी गेली होती. रविवारी घ्यायला येणार म्हणून त्याने पत्नीला फोन करुन सांगितले होते. दुपारी १ वाजता चांदसर येथून दुचाकीने (क्र.एम.एच. १९ ए.जी.८०४४) निघाला. पाळधी सोडल्यानंतर मातोश्री ढाब्याजवळ मागून येणाऱ्या वाहनाने भाऊसाहेब याला धडक दिली. त्यात भाऊसाहेब दुचाकीसह फेकला गेला.नागरिकांनी जैन इरिगेशनची रुग्णवाहिका बोलावून तातडीने भाऊसाहेब याला जळगावला हलविले, मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या अपघातात भाऊसाहेब याच्या शरीरावर कुठेही जखमा नाहीत, मात्र उजवा हात पिळला गेला आहे. दरम्यान, मृतदेह सायंकाळपर्यंत पत्नीला अपघाताची माहिती कळविण्यात आली नव्हती.मोबाईलवरुन पटली ओळखअपघाताच्यावेळी भाऊसाहेब याची ओळख पटली नव्हती. रुग्णवाहिकेतून काही लोकांनी त्याच्या मोबाईलवरुन संपर्क केला असता तो चांदसरमध्ये लागला. तेव्हा त्याची ओळख पटली. भाऊसाहेब हा मजुरी करायचा. त्याच्या पश्चात आई जिजाबाई, वडील प्रभाकर पोपट कोळी, पत्नी मनिषा, मुलगी वैशाली (७), काजल (३) व मुलगा प्रेम (३) असा परिवार आहे.अपघाताची मालिका थांबेनामहामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. गेल्या महिन्यात याच महामार्गावर तिघांचा बळी गेला. मार्च महिन्याच्या सुुरवातीलाच पुन्हा अपघात होऊन तरुणाचा बळी गेला. खराब रस्ते, साईटपट्या, समांतर रस्ते नसणे आदी कारणांनी अपघातांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव