शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

जळगावच्या भाविकांचा अपघात, २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 17:19 IST

९ जखमी : शिरवेलहून परतताना पाल जवळ काळाचा घाला

रावेर/ पाल : श्रावण सोमवारनिमित्त मध्यप्रदेशातील शिरवेलच्या महादेवाचे दर्शन घेऊन येणाऱ्या जळगावातील भाविकांच्या मालवाहू वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन झाडावर आदळून २ युवक ठार झाले तर ९ जण जखमी झाले. पाल जवळ वनविभागाच्या तपासणी नाक्याच्या पुढे थोड्या अंतरावर हा भीषण अपघात २३ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास झाला.या दुर्घटनेबाबत रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव येथील कांचननगर भागातील दहा युवक श्रावण सोमवार निमित्ताने चालकासह मध्यप्रदेशातील शिरवेलच्या महादेवाच्या दर्शनासाठी छोट्या मालवाहू वाहनाने (एम.एच.- १९/सी.वाय- ५३१५) गेले होते. दरम्यान, तिकडून पालमार्गे परत येत असतांना चालक विक्की अरूण चौधरी (वय २५, रा कांचननगर, जळगाव ) हा बेदरकारपणे वाहन चालवत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटून सदरचे भरधाव वेगातील वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर र आदळून पलटी झाल्याने त्यात बसलेले गोलू बंडू परदेशी (वय २६) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६) दोन्ही रा कांचननगर जळगाव हे जागीच ठार झाले. तर सदर मालवाहू वाहनातील भूषण दिलीप सपकाळे (वय २६) ,अजय सुनील वाल्हे (वय २१) , गणेश रवींद्र सोनवणे (वय २३) , परेश निंबा सोनवणे (वय २६) , चेतन रवींद्र मोरे (वय २३) , पवन रवींद्र मोरे (वय २२) , महेश गोविंदा चौधरी (वय २१) , गजानन रमेश पाटील (वय २४) व चालक विक्की अरूण चौधरी (वय २५) (सर्व रा. कांचननगर, जळगाव ) असे ९ जण दुखापत होवून गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात पाल वनविभागाच्या तपासणी नाक्याच्या पुढे अर्धा कि. मी. अंतरावर झाला.या अपघाताची खबर मिळताच पाल दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र राठोड, पोकॉ नरेंद्र बाविस्कर, पोकॉ. दीपक ठाकूर, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, फौजदार अनिस शेख, फौजदार मनोज वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले.दरम्यान, मयत गोलू बंडू परदेशी (वय २६) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६) यांचे मृतदेहाचे रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले.जखमी़पैकी भुषण दिलीप सपकाळे (वय २६) यांचे फिर्यादीवरून रावेर पोलीसात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये वाहनचालक विक्की अरूण चौधरी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख हे तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRaverरावेर