शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Accident : ४० फूट दरीत कोसळली बस ; पाच जणांचा मृत्यू तर ३४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 13:01 IST

रात्री अडीच वाजेची घटना ; नंदुरबारातील कोंडाईबारी घाटात अपघात

नंदुरबार / जळगाव : एका खाजगी ट्रॅव्हल्स बस ने मागून दुसऱ्या बस ला मागून जबर धडक दिल्याने ४० फूट खोल दरीत बस पडल्याने ५ जण जागीच ठार तर ३४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास विसरवाडीहुन १५ किमी अंतरावर कोंडाईबारी घाटात घडली. घटना स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी थांबून आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून त्यांचे ओळख पटविण्‍याचे काम पोलीस करीत आहेत.जळगाव येथून सुरत कडे निघालेली किंग ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला शुभम ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसने मागून जबर धडक दिली. दरम्यान, वळणावर झालेल्या या धडकेत शुभम ट्रॅव्हल्सची बस सुमारे ४० फूट खोल नाल्यात फरफटत जाऊन पलटी झाली. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात पाच जण जागीच मृत पावले तर ३४ जण जखमी झाले. त्यात काहींची प्रकृती गंभीर आहे. बस मधे जळगाव येथील १४ तर सुरत येथील २० प्रवासी होते. पैकी तीन जणांना सुरत येथे, एकास जळगांवला तर अन्य २६ जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.कोंडाईबारी घाटात असलेल्या कॉन्व्हॉय पॉईंटची पोलीस चौकी जवळच असल्याने तेथे तैनात कर्मचारी यांनी अन्य वाहन चालकांच्या मदतीने जखमींना बस बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व अन्य अधिकारी घटना स्थळी धावून गेले असून तेथेच थांबून आहेत. मयतांची ओळख पटविण्याचे कार्य सुरु आहे. अपघातानंतर घटनास्थळी चांगलीच गर्दी झाली होती. चाळीस फूट दरीत कोसळल्यामुळे बसचा पुढील भाग पूर्ण् चक्काचूर झालेला होता.असे आहेत जखमीमोनिका पवन मारोती (१७), अनिलसिंग सदानंद (५२), शोभा अनिलसिंग (४८), श्रेयस पवन पोगलिया (१३), नासीर पठाण (३०), मुकेश चंपकलाल जैन (४०), बलराम सिमनदास वालेचा (५२), पुष्पा विलास पाटील (५५), उर्वषी विनोद पाटील (१०), सैय्यद रियाज (१५), सैय्यद हारून (३५), सैय्यद अफगान (३५), सैय्यद जोया (१३), सुफिया बी अनिफ शहा (३५), रोशनी अमर बारी (२३), आयुश बारी (०५), फारूख शेख गनी (५२), सुफीया बी अतिक शहा (५०), मुकेश रामचंद्र (३७, सर्व रा. सुरत), तसेच शेख खलील शेख इसा (५५), खुशीलदी अय्युब रबी, जेयश भानुदास वाघरे (२८), प्रिया समाधान पाटील (०९), भाग्यश्री समाधान पाटील (०२), नीलेश शांताराम धनगर (२१), शांताराम किसन धनगर (३८), उषाबाई शांताराम धनगर (३५), राजेश धरमदास मतानी (५०), सिध्दार्थ संजय बि-हाडे (२०), विवेक राजेश मतानी (१९), समाधान लालचंद पाटील (३७), रेखा समाधान पाटील (३५), अय्युब पठाण (५४), अस्वरबी अय्युब खान (५०, सर्व रा.जळगाव) हे बस अपघात जखमी झालेले आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव