शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

तरुणींशी गैरवर्तन करणारा खातोय तुरुंगाची हवा, व्यवस्थापकाला एक वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:20 IST

एक वर्ष सक्तमजुरी

जळगाव : कंपनीत पुढे जायचे असेल तर बॉसला खुश करावे लागेल, असे सांगून मुलाखतीसाठी आलेल्या दोन तरुणींना अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या एमआयडीसीतील एका कंपनी शोरुमचा व्यवस्थापक आतिष अशोकराव कोलारकर (३४ रा. नाशिक) यास जिल्हा न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या.मंजुषा नेमाडे यांनी सोमवारी हा निकाल दिला.जळगाव शहर तसेच पारोळा येथील तरुणी नोकरीच्या शोधात होत्या. दोघांना एमआयडीसी परिसरातील या कंपनीच्या शोरुममध्ये जागा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या तरुणी नोकरीसाठी तेथे गेल्या. ४ नोव्हेंबर २०१४ रोजी शोरुमचे व्यवस्थापक मनिष खैरनार यांनी मुलाखत घेतली. नोकरीबाबत नंतर कळवू असे सांगण्यात आले. पुन्हा बोलाविण्यात आल्यानंतर तरुणी पुन्हा तिच्या नातेवाईकासोबत शोरुममध्ये मुलाखतीसाठी गेली. व्यवस्थापक खैरनार यांचा अपघात झाल्यामुळे त्याच्या जागी कोलारकर याची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती.सहा जणांची साक्षएमआयडीसीचे तत्कालीन सपोनि आर.टी.धारबळे व भरत लिंगायत यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्या. मंजुळा नेमाडे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे पिडीत दोघी तरुणी, फिर्यादीची मैत्रीण, वैशाली विसपुते, पंच गोकूळ धोंडू सोनार, धारबळे, कंपनीे व्यवस्थापक मनिष खैरनार यांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षी ग्राह्य धरत न्या. नेमाडे यांनी कोलारकर यास शिक्षा सुनावली. तसेच दंडाची एकूण रक्कम ४ हजार ५०० रुपयांपैकी १५०० रुपये फिर्यादी तसेच पिडीत अशा दोघांना देण्याचे आदेश केले. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. रंजना पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून मुशीर तडवी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव