शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल

By सागर दुबे | Updated: April 5, 2023 15:21 IST

पतीसह मुलांना मारुन टाकण्याचे सांगत ब्लॅकमेलिंग

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३० वर्षीय विवाहितेला जयदीप सुरेश पाटील (३०) याने दुधात झोपेच्या गाळ्या देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर तुझासह पती व मुलांचा खून करेल, अशीही धमकी दिली. याबाबत विवाहितेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेचा पती हा शासकीय कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी पतीची जळगावात बदली झाली. त्यामुळे जळगावात भाड्याचे घर शोधणे सुरू होते. त्या काळात घर शोधण्याच्या निमित्ताने विवाहिता व त्याच्या पतीची जयदीप सुरेश पाटील याच्याशी ओळख झाली. नंतर पाटील याचे विवाहितेच्या घरी येणे-जाणे वाढले. काही महिन्यांपूर्वी विवाहितेच्या पतीची पुन्हा बदली झाली. त्यामुळे जयदीप याला घराकडे लक्ष देण्याचे सांगितले होते. त्यामुळे तो अधून-मधून विवाहितेच्या घरी येऊन जवळीक साधू लागला. एके दिवशी त्याने शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, विवाहितेने त्यास नकार दिल्यावर तो विवाहितेसह तिच्या पती व मुलांचा खून करून टाकेल, अशी धमकी देवू लागला.दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी विवाहिता ही आजारी पडली. जयदीप पाटील हा विवाहितेच्या घरी आल्यानंतर त्याने तिला दुधात काहीतरी गोळ्या दिल्या. याबाबत विवाहितेने त्याना विचारणा केली होती. मात्र, तरीही तीन ते चार दिवस पुन्हा त्याने झोपेच्या गोळ्या दिल्या. दरम्यान, विवाहिता झोपल्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करत होता. हा प्रकार विवाहितेच्या लक्षात आला. नंतर पाटील याने ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर तुझ्यासह पती व मुलांचा खून करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर सोमवारी विवाहितेच्या पतीला त्याने संपर्क साधून शिवीगाळ करून धमकी दिली.

शेवटी विवाहितेने सायंकाळी विषप्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गल्लीतील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विवाहितेला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अखेर मंगळवारी विवाहितेने दिलेल्या जबाबावरून जयदीप सुरेश पाटील याच्याविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी