शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पेट्रोल पंपावर दरोड्यातील प्रयत्नातील फरार आरोपीला जळगावात पिस्तुलसह पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:57 IST

पुण्यातील हिंजवडी परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या रामेश्वर शेषमल राठोड (२५, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी एमआयडीसीतील व्ही.सेक्टरमधील टायटन कंपनीजवळ एक गावठी पिस्तुल व पाच जीवंत काडतुसासह पकडले. राठोड याच्याविरुध्द आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे एमआयडीसी पोलिसांची कारवाई  पाच जीवंत काडतूसही जप्त ‘लोकमत’ च्या वृत्तामुळे सापडला आरोपी

जळगाव : पुण्यातील हिंजवडी परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या रामेश्वर शेषमल राठोड (२५, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी एमआयडीसीतील व्ही.सेक्टरमधील टायटन कंपनीजवळ एक गावठी पिस्तुल व पाच जीवंत काडतुसासह पकडले. राठोड याच्याविरुध्द आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यातील हिंजवडी भागातील आयटी नगरीतील मारुजी रस्त्यावर २४ रोजी रात्री एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना हिंजवडी पोलिसांनी शुभम मनिलाल जैन (२१, रा.गिरीजा कॉलनी, जामनेर), प्रकाश किशोर मोरे (२७, रा.गणेशवाडी, जामनेर), विशाल अरुण वाघ (२२, रा.महुखेडा, ता.जामनेर) व प्रतीक शिवाजी बारी (२०, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) या चौघांना शस्त्रासह पकडले होते तर प्रशांत पाटील व रामेश्वर राठोड हे दोन्ही जण दुचाकीवरुन पसार झाले होते.या चौघांच्या चारचाकीत लोखंडी कट्यार, गुप्ती, चाकू, कोयता, कात्री व बंदुकीसारखे दिसणारे लायटर असे जप्त करण्यात आले होते. चार जण चारचाकी तर राठोड व प्रशांत हे दुचाकीवर होते. पोलीस आल्याचे समजताच दुचाकीवरील दोघांनी चारचाकीमधील चौघांना इशारा केला होता, त्यामुळे चौघांना पलायन केले होते. पोलिसांनी नेर गावाजवळ पाठलाग करुन चारचाकी अडविली होती.राठोडचीही दरोड्याचीच तयारीएमआयडीसीत व्ही.सेक्टरमध्ये एक जण गावठी पिस्तुलसह असल्याची माहिती कॉ.विजय पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, मनोज सुरवाडे, प्रवीण मांडोळे, अशोक सनगत, असीम तडवी व मुदस्सर काझी यांच्या पथकाने तातडीने व्ही.सेक्टर गाठले. राठोड या टायटन कंपनीजवळ आढळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल व पाच जीवंत काडतूस आढळून आले. प्रवीण मांडोळे यांच्या फिर्यादीवरुन राठोड याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क करुन आरोपीची माहिती कळविली आहे. त्यामुळे तेथील पोलीस लवकरच त्याचा ताबा घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘लोकमत’ वृत्तामुळे सापडला आरोपीहिजंवडीच्या गुन्ह्यात रामेश्वर फरार ‘लोकमत’ मध्ये मंगळवारी वृत्त प्रकाशित झाले होते. हे वृत्त कॉ.विजय पाटील यांनी वाचले होते. नेमके बुधवारी राठोडची माहिती कॉ.पाटील यांना मिळाली, आणि पथकाने त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव