शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

आजार मुळासकट नष्ट करण्याची क्षमता ‘होमिओपॅथी’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 13:29 IST

होमिओपॅथी दिन विशेष

ठळक मुद्देरुग्णांना नवसंजीवनी देणारी उपचार पध्दतीकमी खर्चात उपचार होत असल्याने रुग्णांचा कल वाढला; साडेचार हजार औषधी

सागर दुबे / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - थेट आजाराच्या मुळाशी जाऊन तो मुळासकट नष्ट करण्याची क्षमता होमिओपॅथी उपचार पद्धतीत आहे. त्याचा लाभ जवळजवळ ६० टक्के नागरिक घेतात. कमी खर्चात योग्य उपचार होत असल्याने रुग्णासाठी होमिओपॅथी ही नवसंजीवनी देणारी उपचार पद्धती ठरली आहे.१८ व्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते आजतागायत ही पद्धती प्रचलित आहे. जगाच्या विविध भागात होमिओपॅथीचा उपचार केला जातो. याच होमिओपॅथीला केंद्रस्थानी ठेवून जनजागृतीसाठी १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो.डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांचीचिकित्सा पद्धतीडॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी समानाला समान या तत्त्वावर आधारित होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा पद्धती नावारूपास आणली. आधुनिक विज्ञानाच्या कुठल्याही कसोटीवर उतरू न शकलेली ही चिकित्सा पद्धती मात्र आज संपूर्ण जगात मान्यताप्राप्त झाली आहे. एखाद्याला कुठला आजार झाल्यास तो बरा करण्यासाठी प्रतिरसायन देणारी अ‍ॅलोपॅथी ही उपचार पद्धती संपूर्ण जगात मान्यताप्राप्त आहे; पण या उपचार पद्धतीला होमिओपॅथीने आव्हान दिले. विशेष म्हणजे या चिकित्सा पद्धतीचा अवलंब करीत असलेल्यांची संख्या हळूहळू वाढत आहे.होमिओपॅथी सुरक्षित उपचार पद्धतीज्याप्रमाणे सापाच्या विषापासून सर्पदंशावरील औषध बनते तशाच प्रकारचे तत्त्व डॉ. सॅम्युअल यांनी या उपचार पद्धतीत वापरले. त्यांच्या म्हणण्यानुसार रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती ही मानवाच्या शरीरातच असते. त्यामुळे एखाद्या आजारावर औषध म्हणून होमिओपॅथीमध्ये प्रतिजैविके न देता आजाराच्या लक्षणाशी साधर्म्य असणारी जैविकेच अत्यल्प प्रमाणात रुग्णांना दिली जातात.देशात ७ हजार ५०० होमिओपॅथीची शासकीय रुग्णालये असून या रुग्णालयात होमिओपॅथीद्वारेच उपचार केले जातात. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १८० शैक्षणिक संस्थेकडून होमिओपॅथीचे शिक्षण दिले जाते. होमिओपॅथीची औषधे ही अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे कुठलेही साईड इफेक्टस होत नाहीत, असा दावा होमिओपॅथी डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.शरीर, मन आणि आत्मा या तिघांचा समन्वय राखून होमिओपॅथी शास्त्रात उपचार केला जातो. यात आजाराचे समूळ उच्चाटन केले जाते. इतर शास्त्रात मनाचा विचार केला जात नाही. मात्र, यात केला जातो हे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे होमिओपॅथी औषधीमुळे रुग्णाला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. मधुमेह व हृदयविकार मानसिक तणावाशी संबंधित असल्याने होमिओपॅथी अशा रुग्णांसाठी लाभदायक आहे. गरिबांसोबत उच्चभ्रू समाजही या उपचाराकडे वळला आहे.-अविनाश महाजन, होमिओपॅथी तज्ज्ञवैद्यकीय क्षेत्रात गेल्या ३० ते ३२ वर्षांपासून कार्यरत असताना होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णांना सेवा देत आहे. उपचार पद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम नाही. अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांनी नियमित पथ्य पाळावे, गोळ्यांमध्ये नियमितता ठेवावी तसेच निसर्गाविरुद्ध जाऊ नये. -डॉ. विलास महाजन, होमिओपॅथी तज्ज्ञहॉमिओपॅथीमुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू या रोगावर हॉमिओपॅथी सर्वाधिक उपयुक्त आहे. जुन्या आजारांवर उपचार करत असताना रुग्णांच्या आवडी-निवडीसह त्याच्या नियमित गोष्टींचा विचार केला जात असतो. त्यानुसार उपचार केले जातात. हॉमिओपॅथीमध्ये एका दिवसाच्या मुलापासून तर वृद्धांपर्यत उपचार करता येतात. याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्यामुळे आता ज्या व्यक्तींना हॉमिओपॅथीवर विश्वास नव्हता ते देखील मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत.-डॉ.कमलेश मराठे, होमिओपॅथी तज्ज्ञही पद्धती अतिशय संथपणे रुग्णांवर उपचार करते. अनेक वर्षांच्या संशोधनाअंती यात बरेच बदल झाले आहेत. जवळपास ४ हजार ५०० औषधी या उपचारपद्धतीत आज वापरली जात आहेत. आजारानुसार सूक्ष्म अध्ययनाद्वारे अचूक निदान केले जाते. विशेष म्हणजे यात कुठलाही दुष्परिणाम नाही. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करीत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. -तुषार कोठावदे, होमिओपॅथी तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव