शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अबब..जळगाव ते पुणे बसचे तब्बल १९०० रुपये भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:28 IST

जळगाव : लॉकडाउनमध्ये अनेकांच्या हाताचा रोजगार गेला असताना त्यात महामंडळातर्फे जळगाव ते पुण्यासाठी १९०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. ...

जळगाव : लॉकडाउनमध्ये अनेकांच्या हाताचा रोजगार गेला असताना त्यात महामंडळातर्फे जळगाव ते पुण्यासाठी १९०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून लॉकडाउन करण्यात आल्याने अनेक नागरिक, विद्यार्थी व यात्रेकरू इतर जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यासाठी महामंडळ प्रशासनातर्फे मोफत सेवा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रवाशांना या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांचे अनुमती पत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी शासनाने हा निर्णय मागे घेऊन नवीन काढलेल्या आदेशामध्ये फक्त परप्रांतीय बांधवानांच मोफत प्रवास असल्याचे म्हटले होते. तसेच ज्या प्रवाशांनी गावी जाण्यासाठी महामंडळाकडे नोंदणी केली आहे, अशा प्रवाशंकडून प्रति किलोमीटर ४४ रूपये प्रमाणे भाडे आकारण्याच्या सूचना केल्या होत्या. विशेष म्हणजे परतीचे भाडेदेखील आकारण्याच्या सूचना केल्याने जळगाव ते पुणे एका प्रवाशाला १९०० रुपये भाडे भरावे लागणार आहे. त्यानुसार पुणे आगार आणि जळगाव आगार प्रशासनातर्फे प्रवासाची नोंदणी करण्यासाठी येणाºया प्रवाशांना १९०० रुपये भाडे सांगण्यात येत आहे. हे भाडे ऐकुन प्रवाशांना धक्काच बसत आहे.अवाजवी भाडे आकारणीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीदोन दिवसांपूर्वी पुण्याहून एस. टी. महामंडळाच्या बसने काही विद्यार्थी जळगावात परतले. या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १९०० रुपये भाडे आकारण्यात आले. मात्र, कुठल्याही परिस्थितीत घरी जाणे महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांनी कुठलाही विरोध न करता, हे भाडे भरुन जळगावी परतले. मात्र, महामंडळाने ऐन लॉकडाउन मध्ये आकारलेल्या अवाजवी भाडे आकारणीमुळे विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव