शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल, नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्यविकासावर भर

By सागर दुबे | Updated: April 27, 2023 19:40 IST

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी पाठांतर करण्याऐवजी त्यांच्यातील कौशल्य विकासाला वाव देण्यात आला आहे.

जळगाव : नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी पाठांतर करण्याऐवजी त्यांच्यातील कौशल्य विकासाला वाव देण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यांकन करायचे आहे, अशी माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी दिली.

अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने विद्यापीठाशी संलग्नित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिसभा सदस्य यांची नवीन शैक्षणिक धोरणावर गुरुवारी, विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी परीक्षा पद्धतीविषयी प्रा. दलाल यांनी मार्गदर्शन केले. वैदिक काळापासून शिक्षण व मूल्यांकन पद्धतीत बदल होत गेला. गेल्या काही वर्षांत परीक्षेतील गुण डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले गेले. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनीही पाठांतरावर भर दिला होता. यामुळे त्यांच्यातील कौशल्यविकासाला वाव मिळाला नाही. नवीन शैक्षणिक धोरणात पाठांतराऐवजी कौशल्य विकासावर भर राहणार आहे. बोर्डाच्या परीक्षा सोप्या केल्या जाणार असून, त्या पद्धतीने प्रश्नपत्रिका, मूल्यामापन व मूल्यांकन केले जाणार आहे. उन्हाळी परीक्षा, प्रश्नपत्रिकांचे ऑनलाइन सेटिंग, डिलिव्हरी आणि ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन याची माहिती प्रा. दलाल यांनी दिली.

डिजिलॉकर, एबीसीवर नोंदणी आवश्यकप्रत्येक विद्यार्थ्याने डिजिलॉकर व एबीसी (अकादमिक बँक ऑफ क्रेडिट) या ठिकाणी नोंदणी करणे सक्तीचे आहे. विद्यापीठाच्या १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख २२ हजार जणांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. शैक्षणिक सत्र २०२३-२४ सुरू करतानाच नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले. या सुविधेमुळे एका विद्यापीठाचे क्रेडिट दुसऱ्या विद्यापीठातील पदवीसाठी वापरता येणार आहेत. याला बोर्ड ऑफ स्टडीज् मान्यता देईल.

इतर कॉलेजमध्येही शिकू शकतानवीन धोरणात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर विभाग करण्यात येतील. मायनर विभागात विद्यार्थ्यांना आपल्या शाखेच्या व्यतिरिक्त आवड असलेला विषय शिकता येईल. तो विद्यार्थी इतर महाविद्यालयातूनही आवडीचा विषय शिकू शकेल, अशी माहिती सत्रात देण्यात आली

टॅग्स :Jalgaonजळगाव