शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर दोन लाखापैकी एक लाखाची मागितली लाच, ग्रामसेवक व ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 23:44 IST

या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जळगाव  : १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर झालेल्या दोन लाख रुपयांच्या निधीपैकी एक लाख रुपयांची लाच मागणारा ग्रामसेवक आणि डीडीपी ऑपरेटर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (रा.साकळी, ता.यावल) याने सांगितल्याने एक लाखाची लाच स्वीकारताना ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (३५, रा. चुंचाळे) याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाईत शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतमध्ये करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी असलेल्या तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीमधून गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याच्या योजनेसाठी केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या मंजूर निधीच्या ५० टक्के रक्कम अर्थात एक लाख रुपये लाचेची मागणी चुंचाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत जोशी याने केली. या विषयी तक्रारदाराने शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ग्रामसेवक जोशी याने सांगण्यावरून ऑपरेटर सुधाकर कोळी हा एक लाख रुपये स्वीकारत असताना सापळा रचून असलेल्या पथकाने रंगेहात पकडले.

याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, सुनील वानखेडे, पोहेकॉ रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग