शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नव्या घराच्या मीटरसाठी मागितली लाखाची लाच!

By विजय.सैतवाल | Updated: January 10, 2024 15:02 IST

कंत्राटी वायरमन जाळ्यात : जळगाव एसीबीची कारवाई.

जळगाव : नवीन बांधलेल्या घरामध्ये वीज मीटर बसविण्यासाठी व दंडाचे प्रकरण मिटविण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना कंत्राटी वायरमन प्रशांत विकास जगताप (३३, रा. जळगाव) याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवार, ९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता टॉवर चौकानजीक करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील तक्रारदाराने नवीन घर बांधले. या घरामध्ये वीज मीटर घेण्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. मात्र त्यांच्याकडे मीटर बसवले गेले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली. त्यांना चार लाख ६० हजार रुपयांची दंडाची रक्कम भरली, तरच वीज मीटर मिळेल, असा निरोप कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप याने दिला होता. त्यानुसार तक्रारदारांनी कंत्राटी वायरमनची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली. 

तडजोडीमध्ये हे प्रकरण १ लाख ४० हजार रुपयांमध्ये मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक सुनील वानखेडे, बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने यांनी सापळा रचून मंगळवार, ९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता टॉवर चौकानजीक १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना जगताप याला रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव