शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव पोलीस दलाच्या जनतेशी निगडीत ९ सेवा आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 11:55 IST

डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांसाठी या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासत नाही. तंत्रज्ञानात पोलीस दलानेही एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचा पुढाकारघरबसल्या मिळवा परवानग्यासेवा सुरु करणारा जळगाव राज्यातील पहिला जिल्हा 

सुनील पाटीलआॅनलाईन लोकमतजळगाव : डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांसाठी या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासत नाही. तंत्रज्ञानात पोलीस दलानेही एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या ९ सेवा आॅनलाइन झाल्याने नागरिकांना पोलीस स्टेशनला जाण्याची आता आवश्यकता नाही. वेळेचाही अपव्यय होत नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. महाआॅनलाइनमध्येही पोलीस दल अग्रेसर आपत्कालीन, गुन्ह्यांच्या तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी पीडित नागरिक व महिलांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी यासाठी महाआॅनलाइनमध्ये प्रतिसाद अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक, याशिवाय वाहनचोरीची तक्रार करण्यासाठी वाहन चोरी डॉट कॉम हे पोर्टल २७ मे २०१६ पासून सुरू  करण्यात आले आहे.  लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी यासाठी आवश्यक असलेली मिरवणूक परवानगी, विविध शस्त्र परवाना, हॉटेल व बियरबार यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, भारतीय नागरिकांसाठी परदेशी चारित्र्य पडताळणी, वैयक्तिक चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, चित्रपट, तमाशा, लोकनाट्य, नाटक व इतर मनोरंजन परवाने, विविध समारंभासाठी लागणारे ध्वनिक्षेपण (लाऊड स्पीकर व अन्य वाजंत्री) व विहीर तसेच तलावात करावयाचे ब्लास्टिंग परवाने आॅनलाइन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या समन्वयातून या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. आपले सरकार पोर्टलवर जाऊन नागरिकांना या सेवांचा फायदा घेता येणार आहे.प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन टॅबतंत्रज्ञानात आणखी पुढचे पाऊल म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दोन स्वतंत्र टॅब देण्याचा निर्णय घेतला.एक टॅब हा गुन्ह्यांच्या माहितीसाठी असणार आहे, तर दुसरा टॅब हा पासपोर्टसाठी असणार आहे. घटनास्थळावर फोटो काढणे, व्हिडिओ चित्रण करणे, पुरावे घेणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी स्वतंत्र टॅब देणारा जळगाव हा महाराष्टÑातील पहिला जिल्हा आहे.

सायबर प्रकल्पाची निर्मितीनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरून गुन्हे करण्याचे प्रमाण व त्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या साºया घटनांना वेळेत नियंत्रण आणण्यासाठी गृह विभागाने सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरावर सायबर लॅब, महाराष्टÑ सीईआरटी, सिक्युरिटी आॅपरेशन सेंटर व ट्रेनिंग सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्टÑात ४७ ठिकाणी सायबर लॅब होत्या, त्याचे रूपांतर सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. महाराष्टÑात बहुतांश ठिकाणी पोलीस ठाण्यात रूपांतर झालेले नाही, जळगावात मात्र हे पोलीस ठाणे सुरू झाले.

या आहेत आॅनलाइन सेवा१. मिरवणूक परवानगी२. शस्त्र परवाना३. हॉटेल व बियरबार यांचे   ना-हरकत प्रमाणपत्र४. परदेशी (नोरी) चारित्र्य पडताळणी५. चारित्र्य पडताळणी६. पासपोर्ट७. मनोरंजन परवाने८. ध्वनिक्षेपण (लाऊड स्पीकर व अन्य वाजंत्री)९. ब्लास्टिंग परवाना

जनतेला प्रत्येक वेळी पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची गरज भासू नये यासाठी महत्त्वाच्या व वारंवार गरज भासणाºया ९ सेवा आॅनलाइन करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित कामेही यात होणार आहे. -दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा