बस स्थाकासमोर पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : मनपातर्फे अतिक्रमण कारवाई मोहिम थंडावल्याने, शहरातील सर्व रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण थाटत असतांना नवीन बस स्थानकासमोरही पुन्हा अतिक्रमण थाटायला सुरूवात झाली आहे. या हातगाड्यांचा परिणाम रस्त्यावरील वाहतूकीवर होत असून, दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने पुन्हा अतिक्रमण मोहिम सुरू करण्याची मागणी होत आहे.
रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकी २४ तास सुरू ठेवण्याची मागणी
जळगाव : रेल्वे स्टेशन समोर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र, ही चौकी दिवसा सुरू आणि रात्री बंद असते. त्यामुळे रात्रीच्या गाड्यांनी येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे रेल्वे स्टेशन समोरील पोलीस चौकी २४ तास सुरू ठेवण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.