शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 12:29 IST

केंद्रीय कोट्यातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश

ठळक मुद्देमुलींच्या वसतिगृहाच्या जागेत बदलकेंद्रीय कोट्यातील ३ तर राज्य शासनाच्या कोट्यातील ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी

जळगाव : येथे सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात केंद्रीय कोट्यातील १५ पैकी १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून आता एकूण ९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या विद्यार्थ्यांसह प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुलींच्या वसतिगृहाबाबत झालेल्या करारानुसार ऐनवेळी मक्तेदाराने नकार दिल्याने या वसतिगृहाच्या जागेत बदल करण्यात येऊन हे वसतिगृह शहरातील गिरणा टाकी परिसरात राहणार आहे.जळगाव येथे जिल्हा रुग्णालयापासून वैद्यकीय महाविद्यालयास सुरुवात झाली असून त्यामध्ये राज्य शासनाच्या कोट्यातील ८५ पैकी ७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर केंद्रीय कोट्यातील १५ विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थ्यांनीदेखील प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे एकूण ९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून केंद्रीय कोट्यातील ३ तर राज्य शासनाच्या कोट्यातील ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.मुलींच्या वसतिगृहाच्या जागेत बदलशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे स्थानक रस्त्यावर तर विद्यार्थिनींसाठी महामार्गावर मानराज पार्कनजीक वसतिगृह घेण्यात आले. मात्र मुलींच्या वसतिगृहाचा करार ४ लाखात झालेले असताना ऐनवेळी मक्तेदाराने दुप्पट रक्कम सांगत ८ लाखाची मागणी केली. त्यामुळे शासकीय नियमानुसार ते शक्य नसल्याने हा करार रद्द करीत गिरणा टाकी परिसरात दुसरे वसतिगृह घेण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव