एरंडोल : येथे शहरापासून जवळपास १.५ कि.मी. अंतरावरील आय. बी. पी. पेट्रोल पंपा मागील गोडाऊन मधून श्रीराम हार्डवेअरचे मालक जगन्नाथ ठाकूर यांचा ८८ हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.ही घटना २४ जूनच्या रात्री घडली. टेबल फॅन, वायर बंडल, आटा चक्की, नळांचे सेट, सिलिंग फॅन आदी सामानाची चोरी झाली. २५ रोजी ते माल घेण्यासाठी गेले असता त्यांना गोडाउनचे शटर उघडले दिसले. आत गेल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी एरंडोल पो.स्टे.ला तक्रार दिली असून २६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.फौजदार अशोक मोरे हे करीत आहे.एरंडोल परिसरातदुचाकी चोरीचे सत्र सुरूचएरंडोल परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. येथील मारुती मढी परिसरातील सुरेश जगन्नाथ महाजन यांची एम.एच.१९ डीएफ ८१०७ युनिकॉन कंपनीची दुचाकी अंगणात उभी केलेली असता अज्ञात चोरट्यांनी ती लांबवली. ही घटना२६ जून रोजी रात्री घडली. याबाबत एरंडोल पो. स्टे. ला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे.काँ. सुनील लोहार हे तपास करीत आहे. दरम्यान पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
८८ हजाराच्या मालाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:13 IST