शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आयटीआयच्या २१ ट्रेडसाठी ८६४ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 21:08 IST

प्रवेश प्रक्रिया सुरू : प्रवेश अर्ज निश्चितीसाठी विद्यार्थ्यांची झुंबड

ठळक मुद्देआॅनलाइन अर्ज करणे - १ ते ३० जून८६४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया

जळगाव- शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे़ आयटीआय प्रवेश यंदाही आॅनलाइन पद्धतीने होत असून अर्ज करण्यासाठी ३ जून ते ३० जून अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक माहितीपुस्तिका वाचून आॅनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयकडून देण्यात आली. दरम्यान, यंदा आयटीआयच्या २१ ट्रेडमधील ८६४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.कसा करावा अर्जराज्यातील सर्व आयटीआय संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. तेथून प्रवेशाची माहितीपुस्तिका प्राप्त करू शकतील. आॅनलाइन अर्ज ३ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत़ आॅनलाइन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते, त्याचा नोंदणी क्रमांक हाच युजर आयडी म्हणून तयार होईल. अर्ज भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत घ्यावी व प्रवेश अर्ज निश्चित करावा. प्रवेश अर्ज व प्रवेश निश्चितीसाठी प्रमाणपत्रे आयटीआय संस्थेत सादर करावीत. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर अर्ज निश्चितीकरण पावती व निश्चिती केलेल्या प्रवेश अर्जाची प्रत संस्थेमार्फत देण्यात येतील. त्यानंतरच अर्जाची फेरीसाठी विचार करण्यात येईल.जास्त अर्ज निश्चित केल्यास अर्ज होईल रद्दउमेदवाराने एकच अर्ज निश्चित करावा, अशा सूचना आहेत़ दरम्यान, एकापेक्षा जास्त अर्ज निश्चित केल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील, असेही आयटीआयकडून कळविण्यात आले आहे. जर अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवशे देण्यात आला असल्याच त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवारा संपूर्ण प्रक्रियेतून बाद होईल. यामुळे एकच अर्ज निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी ३ जुनपासून आॅनलाइन प्रवेश अर्ज व चौथ्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.असे आहेत प्रवेश अर्ज शुल्क- अराखीव प्रवर्ग उमेदवार --- १५० रूपये- राखीव प्रवर्ग उमेदवार --- १०० रूपये- महाराष्ट्र राज्याबाहेर उमेदवार --- ३०० रूपये- अनिवासी भारतीय उमेवार --- ५०० रूपयेआयटीआय प्रवेश वेळापत्रकआॅनलाइन अर्ज करणे :- १ ते ३० जूनप्रवेश अर्ज निश्चित करणे :- ६ जून ते १ जुलैपहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प व प्राधान्यक्रम भरणे :- ६ जून ते १ जुलैप्राथमिक गुणवत्ता यादी :- ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता़गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे :- ४ ते ५ जुलैअंतिम गुणवत्ता यादी :- ९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता़पहिली प्रवेश फेरी :- ११ जुलै ते १५ जुलैदुसरी प्रवेश फेरी :- १२ ते १६ जुलैतिसरी प्रवेश फेरी :- २१ ते २५ जुलैचौथी प्रवेश फेरी :- ३१ जुलै ते ३ आॅगस्टसमुपदेशन फेरी :- १२ आॅगस्ट, सायंकाळी ५ वाजतापुन्हा अर्ज करता येणारमुदतीच्या आत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी आॅनलाइन पध्दतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे़ नंतर अर्जांची दुरूस्ती, प्रवेश अर्ज पुणृ भरल्यानंतर अर्जाची छापिल प्रत घेणे, अर्ज स्विकृती केंद्रात मुळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज शुल्क भरून अर्ज निश्चत करता येणार आहे़ ही प्रक्रिया २२ जुलैपासून तर १० आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे़ट्रेडचे नाव                                             जागाकॉम्प्युटर आॅपरेटर प्रोग्रामिंग               ४८सुतारकाम                                               २४फॉन्ड्रीमॅन                                               २०ट्रॅक्टर मॅकेनिक                                       २०पंप आॅप्रेटर कम मॅकेनिक                     २०संधाता                                                   ८०मॅकेनिक डिझेल                                     ४०प्लॅस्टिक प्रोसेसिंग आॅपरेटर                ४०यंत्र कारागिर                                         ८०यंत्र कारागिर घर्षक                               ४८जोडारी                                                 ८०कातारी                                                ४८विजतंत्री                                              ८०तारतंत्री                                               २०रेफ्रीजीरेटर अ‍ॅण्ड एअर कंडीशनर         २४यांत्रिक मोटार गाडी                             ४०ईलेक्ट्रानिक्स मेके ़                           ४८मॅकेनिक मश्नि टुल मेटन्स                 ४०यांत्रिक आरेखक                                 २०टुल अ‍ॅण्ड आयमेकर                           २०इस्टुमेंन्ट मॅकेनिक                             २४---------------------------------------------एकूण ट्रेड २१                                जागा- ८६४

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव