शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

जळगाव जिल्ह्यातील वनक्षेत्रात 7 वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:01 PM

जागतिक व्याघ्रदिन : वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल वनक्षेत्र

ठळक मुद्दे यावल अभारण्यात सुमारे 3 तर मुक्ताईनगर रेंजमध्ये वढोदा, चारठाणा परिसरात दोन मोठे व दोन बछडे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजनया वनक्षेत्रातील अन्नसाखळी पूर्ण झालेली असल्यानेच वाघांचा अधिवास

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - जिल्ह्यातील वनक्षेत्र हे वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल  असून अन्नसाखळी पूर्ण झालेली असल्याने यावल अभारण्यात सुमारे 3 तर मुक्ताईनगर रेंजमध्ये वढोदा, चारठाणा परिसरात दोन मोठे व दोन बछडे असे 7 वाघ आढळून आले असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली. 2010 मध्ये रशियात झालेल्या ‘टायगर समिट’ मध्ये वाघांच्या अस्तित्वाचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी तसेच त्याचा अधिवास असलेले वनक्षेत्र जपण्याचे आवाहन करण्यासाठी  29 जुलै रोजी ‘जागतिक व्याघ्रदिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी हा व्याघ्रदिवस वनविभागातर्फे साजरा केला जातो. तसेच त्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. यंदा मु.जे. महाविद्यालय व नूतन मराठा महाविद्यालयातील विद्याथ्र्याना वनक्षेत्र जपण्याबाबत जनजागृतीपर चित्रफित दाखविण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी दिली. मुक्ताईनगर वढोदा, चारठाणा, कु:हाकाकोडा रेंजमध्ये पूर्वी 1 वाघीण होती. 12 हजार हेक्टरचे हे वनक्षेत्र ‘मुक्ताई-भवानी संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले. आता या वनक्षेत्रात 2 मोठे वाघ तर दोन बछडे आढळून येतात. या वनक्षेत्रातील अन्नसाखळी पूर्ण झालेली असल्यानेच वाघांचा अधिवास असल्याचे मानले जाते. तर यावल अभारण्यात सुमारे 3 वाघांचा वावर असल्याचे समजते. या जंगलात बिबटे, अस्वल, लांडगे, कोल्हे यासह विविध वन्य प्राणीही आहेत. सोशल मीडियावर वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीजवळ वाघ दिसल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत उपवनसंरक्षक रेड्डी तसेच सहायक वनसंरक्षक डी.आर. पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मात्र हा व्हीडीओ चंद्रपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले.