7-day Akhand Jyoti Kirtan Festival in Chopad | चोपड्यात १७ दिवसीय अखंड ज्योती कीर्तन महोत्सव
चोपड्यात १७ दिवसीय अखंड ज्योती कीर्तन महोत्सव

चोपडा, जि.जळगाव : संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती व पुण्यतिथीनिमित्ताने ८ ते 24 डिसेंबर दरम्यान चोपडा येथे १७ दिवसीय अखंड ज्योती संकीर्तन महोत्सव आयोजित ेकेला आहे. रोज रात्री आठ ते दहा या वेळेत तेली समाज मंगल कार्यालयात हा उपक्रम होईल.
यात दररोज विविध जाती-धर्माच्या संतांचे अभंग व संकीर्तन होईल. हरिभक्त पारायण बापू महाराज लासूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ८ रोजी पांडुरंग महाराज रेल-लाडली यांचे कीर्तन झाले.
९ रोजी प्रसाद बागुल महाराज चोपडा, १० रोजी अशोक महाराज शिरपूरकर, ११ रोजी शांताराम महाराज शेंदुर्णी, १२ रोजी गजानन महाराज धानोरा, १३ रोजी हेमंत महाराज अडावद, १४ रोजी माधव महाराज धानोरा, १५ रोजी अशोक महाराज आडगाव, १६ रोजी रवींद्र महाराज दहिवेलकर, १७ रोजी कन्हैया महाराज शेंदुर्णी, १८ रोजी चेतन महाराज मालेगाव, १९ रोजी भागवत महाराज शिरसोली, २० रोजी सोपान महाराज वडगाव, २१ रोजी विवेक महाराज वेले, २२ रोजी गोविंद महाराज कुरंगी, २३ रोजी बापू महाराज लासूरकर, २४ रोजी गजानन महाराज चौगाव यांचे काल्याचे कीर्तन होईल.
यावेळी मृदंगाचार्य हर्षल महाराज चांदसर व गायनाचार्य गोविंद महाराज कुरंगी विठोबा महाराज घाडवेल शुभम महाराज हिंगोना यांची साथ लाभणार आहे. ही कीर्तने अनेक दात्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली आहेत. कीर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज या संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी केले आहे.

Web Title: 7-day Akhand Jyoti Kirtan Festival in Chopad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.