शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

रावेर तालुक्यात पिकांचे ६३ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:27 IST

कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे.

ठळक मुद्देसततच्या मुसळधार पावसाने खरिपातील उभ्या ज्वारी व कापसाची धुळघाणज्वारी काळी होऊन, तर पांढऱ्या सोन्याच्या निम्मे कैºया सडून उत्पन्नात घट, शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल

किरण चौधरीरावेर : कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे. तथापि, गत चार-पाच दिवसांपासून सातत्याने कुठे अर्धा तास, कुठे पाऊण तास तर कुठे तासभर कोसळधाºया पावसाने आता खरिपातील उभ्या कापसाच्या पिकाच्या निम्मे कैºया सडून काळ्या पडल्याने तर फुललेल्या बोंडातील कापूस ओला होऊन मातीमोल होत असल्याने तथा उभ्या ज्वारी पिकांची कणसे काळी पडून ऐन तोंडी आलेला उत्पन्नाचा घास वाया जाणार असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. बुधवारीही तालुक्यात दुपारी तासभर व सायंकाळीही मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.रावेर तालुक्यात जूनच्या आरंभी तीन टप्प्यात झालेल्या वादळी पावसाने ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त होऊन ३७ कोटींचे नुकसान झाले होते. तेव्हा शासन दरबारी नुकसानीचे पंचनामेही सादर करण्यात आले. किंबहुना, केळी फळपीक विमा कंपन्यांनी स्वतंत्र पंचनामे करून लाल फितीत बंदिस्त केले आहेत.दरम्यान, खरिपाच्या उडीद व मूग पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उडीद, मूगाच्या हंगामाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. अपवादात्मक परिस्थितीत उडीद, मूगाचे आलेले चांगले उत्पादनही पावसात भिजल्याने हातचे गेल्याची शोकांतिका आहे. खरीप हंगामाची बोहणीच भोपळ्याने झाल्याने नेत्रसुखद असलेल्या खरिपातील कापूस, ज्वारी, मका, भुईमूग, सोयाबीन व तीळ पिकांना काळाची दृष्ट लागली.दरम्यान, कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तालुक्यातील तीन हजार हेक्टरमधील केळी बाधित होऊन ६० कोटी ५५ लाख रुपयांचे तर नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या पायथ्यापासून ते तापी काठापर्यंत ३८ गावातील १ हजार १२५. ८७ हेक्टरमधील केळीबागा, ज्वारी, मका तूर व कापसाचे पीक जमीनदोस्त होऊन अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. एकंदरीत, ६३ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रश्न निकाली निघत नाही तोच गत पाच-सहा दिवसांपासून अधून-मधून काही भागात अर्धा तास, काही भागात पाऊण तास तर काही भागात तासन् तास होत असलेल्या कोसळधार पावसाने आता उभ्या खरिपाचीही धुळघाण होऊन गंभीर वाताहत सुरू झाली आहे.तालुक्यात सरासरी ६५०.४३ मि.मी. अर्थात ९७.३६ टक्के पाऊस झाला असला तरी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐन कापणी व मळणीच्या प्रतीक्षेत असलेले ज्वारीचे कणसं काळी पडून ज्वारी रंगहीन व बुरशीने कुजून वजनाने हलकी होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे ज्वारीचचया उत्पन्नाचा ऐन तोंडी येणारा घास वाया जाण्याची शक्यता आहे. किंबहुना, खरीपपूर्व लागवडीखालील आघात कापसाच्या वेचणीच्या प्रतीक्षेत बोंडावर फुललेला कापूस सततच्या पावसामुळे ओला होऊन खाली पडून मातीमोल होत आहे. किंबहुना परिपक्व झालेल्या कापसाच्या झाडावरील निम्म्यापेक्षा जास्त कैºया काळ्या पडून सडत आहेत. त्यामुळे केळी बागायतीत व खरीप उत्पादनात उत्पन्नाची आशा कमालीची धुसर झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसRaverरावेर