जळगाव- शिक्षण हक्क कायद्यातंर्गत २५ टक्के (आरटीई) जागांसाठी गुरूवारी तिसरी फेरी सुध्दा पूर्ण झाली. आतापर्यंत आरटीईसाठी ६३ टक्के प्रवेश पूर्ण झालेले असून उर्वरित जागांसाठी पुन्हा शासनाकडून मुदत वाढ देण्याची शक्यता आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के जागांवर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यानुसार सोडत काढून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली़ ही आरटीई प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांसाठी राबविण्यात आली असून त्यासाठी तीन फे-या घेण्यात आल्या. या तीन फेऱ्यांद्वारे ३७१७ पैकी २६२६ जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत़ उर्वरित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता यावे, यासाठी मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे. तसेच अजूनही हजाराच्यावर पालक आपल्या पाल्याच्या प्रवेश निश्चितीसाठी शाळांपर्यंत पोहोचलेले नाही़ तर ४ विद्यार्थ्यांचे प्रवेश हे कागदपत्रांअभावी रद्द करण्यात आलेले आहेत.७५३ पैकी ४५४ विद्यार्थ्यांचा प्रवेशआरटीईच्या तिसºया फेरीत जिल्ह्यातील ७५३ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले होते. दरम्यान, त्यापैकी ४५४ विद्यार्थ्यांचीच आपला प्रवेश शाळांमध्ये घेतला आहे़ उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश निश्चित केलेला नाही.
आरटीईसाठी ६३ टक्के प्रवेश पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 20:14 IST