शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षातील ६२ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:52 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या एकूण ६२ हजार ९५३ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे़ दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात शंका असल्याचे त्याचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाकडून शंका निरसन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे़देशासह राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले़ परिणामी, अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व बंद करण्यात आले़ त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुध्दा बंद होती़ तर महाविद्यालयीन परीक्षांनाही स्थगिती देण्यात आली होती़ दरम्यान, नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाने आॅगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि सप्टेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचे सांगितले आहे़ त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून वेळापत्रक निश्चितीसाठी त्याच बरोबर परीक्षांच्या नियोजना संदर्भात रोज बैठका घेऊन नियोजन केले जात आहे़ त्याच बरोबर विद्यार्थ्यांना परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाकडून शंका निरसन कक्षाचीही स्थापना केली आहे़कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून जुलै महिन्यात घेण्यात येणार परीक्षांना अंतिम वर्षातील ६२ हजार ९५३ विद्यार्थी बसतील़ त्यात ३९ हजार ८५० विद्यार्थी तृतीय वर्षाती प्रवेशित नवीन विद्यार्थी तर २३ हजार १०३ रिपीटर विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ तसेच एकूण संख्येत तीन वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे ३९ हजार ४९७ तर दोन वर्ष अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे १६ हजार ४८७ तसेच चार ते पाच वर्षातील अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील ६ हजार ९६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे़एकूण २५० परीक्षा होणारपूर्वीच्या नियोजनानुसार ८५० परीक्षा घेतल्या जाणार होत्या़ मात्र, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता अंतिम वर्षाच्रूा एकूण २५० च्यावर परीक्षा होणार आहेत़ तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेतली जाणार आहे़ त्याबाबत विद्यापीठाकडून सूचना देण्यात येणार आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव