शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

खान्देशातील ८३ महाविद्यालयांमध्ये ६२० प्राध्यापकांचा जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 20:55 IST

राज्य शासनाकडून गेल्या पाच वर्षांपासून प्राध्यापक भरतीवर लावलेल्या ब्रेकमुळे खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ६२० प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत.

ठळक मुद्दे२ लाखाहुन अधिक विद्यार्थ्यांचा भार २ हजार प्राध्यापकांवर शिक्षणाची बिकट स्थितीप्राध्यापक भरतीस पात्र विद्यार्थ्यांचेही नुकसानलोकप्रतिनीधी देखील बोलायला तयार नाहीत

आॅनलाईन लोकमत

अजय पाटील, जळगाव-दि.८-राज्य शासनाकडून गेल्या पाच वर्षांपासून प्राध्यापक भरतीवर लावलेल्या ब्रेकमुळे खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ६२० प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील २ लाख हुन अधिक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा भार २ हजार प्राध्यापकांवर आहे. शासनाकडून नवीन प्राध्यापक भरती होत नसल्याने  पात्र उमेदवारांना देखील नोकरीच्या संधी मिळत नाही.

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात महाविद्यालयांची संख्या व बाहेरुन येणाºया विद्यार्थ्यांसह खान्देशातील विद्यार्थ्यांची वाढत जाणारी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे विद्यापीठाकडून आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. मात्र दर्जेदार शिक्षणाचा मुख्य घटक असलेल्या प्राध्यापकांच्या ६०० हुन अधिक जागा रिक्त असताना उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमधील गुणवत्ता कशी वाढणार ? हा प्रश्न देखील अनेक प्राध्यापक संघटना व शिक्षण तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. १०० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापकजळगाव,धुळे व नंदुरबार जिल्'ातील ८३ महाविद्यालयांमध्ये २ लाख हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या या महाविद्यालयांमध्ये २ हजार हुन अधिक प्राध्यापक शिक्षण देत आहेत. त्यामुळे एका प्राध्यापकावर अंदाजे १०० विद्यार्थ्यांचा भार आहे. महाविद्यालयांमध्ये अशी स्थिती असताना विद्यार्थ्यांना गुणवत्तेचा शिक्षण मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. ‘लोकमत’ला मिळालेली रिक्त पदाची स्थिती ही जुलै २०१६ ची असून वर्षभरात १०० हुन अधिक निवृत्त झाल्याची धक्कादायक माहिती शिक्षण तज्ज्ञांनी ‘लोकमत’ ला दिली आहे.

प्राध्यापक  भरतीस पात्र विद्यार्थ्यांचेही नुकसानदरम्यान, खान्देशात जवळपास १ हजार हुन अधिक विद्यार्थी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. मात्र भरती प्रक्रियेवर शासनाने यावर सध्या स्थगिती आणली असल्याने नेट-सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खासगी अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर किंवा कंत्राटवर काम करावे लागत  आहे. तसेच त्यांना केवळ ५ हजार ते ७ हजार रुपये दरमहिन्याला दिले जात आहे.  यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबत इतर व्यवसाय सुध्दा करावा लागत आहे.

लोकप्रतिनीधी देखील बोलायला तयार नाहीतराज्यातील तोडक्या समस्यांसाठी विधानभवनात नेहमी गदारोळ करणारे लोकप्रतिनीधी देखील प्राध्यापक भरतीवर  काहीही बोलायला तयार नाहीत. जगाचा गुरु होण्याची क्षमता बाळगलेल्या भारतातील विद्यार्थ्यांनाच गुरु उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचा भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. तसेच खान्देशातील महाविद्यालयांप्रमाणे राज्यातील इतर  महाविद्यालयांची स्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे प्राध्यापकांच्या रिक्त जागांबाबत लोकप्रतिनीधींनी देखील शासनाकडे प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे.

विना अनुदानित महाविद्यालयांची स्थितीही बिकटउमवि कार्यक्षेत्रात एकूण २१० महाविद्यालये आहेत. यामध्ये अनुदानित ८३ महाविद्यालये बाद केल्यास १२७ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. या  महाविद्यालयांमध्ये देखील ८०० हुन अधिक प्राध्यापकांच्या रिक्त आहेत. तर या महाविद्यालयांमध्ये १ हजार ८०० शिक्षकांवर २ लाखहुन अधिक विद्यार्थ्यांचा भार आहे.

जिल्हा निहाय रिक्त जागांची स्थिती

जिल्हा  - मंजुर पदे - भरलेली पदे - रिक्त पदेजळगाव- १,४०० - १,१०० - ३००धुळे- ८५० - ६५० - २००नंदुरबार - ५०० - ३८० - १२०

कोट..खान्देशातील ८३ महाविद्यालयांमध्ये ६२० प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र भरतीप्रतक्रियेवर स्थगिती असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी तासिका तत्वावर शिक्षक उपलब्ध करून दिले जात आहेत. तर इतर विद्यापीठांच्या तुलनेने उमविच्या महाविद्यालयांची स्थिती काही मानाने चांगली आहे.-डॉ.केशव तुपे, सहसंचालक, उच्चशिक्षण

प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. शासनाने प्राध्यापक भरती केल्यास विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळू शकते. तसेच अनेक विद्यार्थी प्राध्यापक भरतीस पात्र आहेत. त्यांना देखील रोजगार मिळू शकणार आहे. याबाबत प्राध्यापक संघटनांकडून नेहमी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.-प्रा.बी.पी.सावखेडकर, जनरल सेक्रेटरी,एन.मुक्टो.संघटना