शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील ५८ जणांचे एकत्र मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 09:51 IST

Maharashtra Vidhan Sabha 2024: विशेष म्हणजे, परिवारातील चार नवमतदारांनी प्रथमच मतदान केले आहे. त्यासाठी ते पुण्याहून आले होते. 

संजय सोनवणे, चोपडा Maharashtra Election 2024: तालुक्यातील चुंचाळे येथील महाजन परिवारातील वेगवेगळ्या गावांत स्थिरावलेल्या ५८ मतदारांनी आपल्या मूळगावी एकत्र येऊन तेथील मतदान केंद्र क्रमांक ६५ मध्ये मतदान केले. चार भाऊ आणि प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्य असा हा परिवार आहे.

महाजन परिवारात शिक्षक, इंजिनिअर, व्यावसायिक आहेत. यापैकी काही जण पुणे येथे वास्तव्याला आहेत. या सर्वांनी एकत्रितपणे मतदानाचा हक्क बजावून आदर्श निर्माण केला आहे. 

यासाठी शिक्षक जी. एस. महाजन, बी. जी. महाजन, वासुदेव महाजन, राजेंद्र महाजन, जितेंद्र महाजन, अक्षय महाजन, चुंचाळेचे पोलिस पाटील सुनील महाजन, तेजस महाजन  यांनी प्रयत्न केले. विशेष म्हणजे, परिवारातील चार नवमतदारांनी प्रथमच मतदान केले आहे. त्यासाठी ते पुण्याहून आले होते. 

दोघांचेच मतदान

कजगाव (जि. जळगाव) :  उमरखेड (ता. भडगाव) येथील मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २३५ पैकी फक्त दोनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमरखेड हे गाव कजगावपासून दोन किमी अंतरावर आहे. या गावात दुपारी दीड वाजेपर्यंत  फक्त एका वृद्ध मतदाराने तर  दुपारी साडेतीन वाजता आणखी एका मतदाराने मतदान केले.

दोन सदस्यांचे १७ वेळा मतदान...

परिवारातील यमुना शहादू महाजन (८८) व अनसूया माधव महाजन (८८) या दोघींनी विधानसभेसाठी १७ वेळा मतदान केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकchopda-acचोपडाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग