शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

अभाविपचे ५२ वे प्रदेश अधिवेशन जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 19:40 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५२ व्या प्रदेश अधिवेशनाचे आयोजन जळगावात २४ ते २६ डिसेंबर दरम्यान शिवतीर्थ मैदानावर करण्यात आले आहे. अधिवेशनाची स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२४ ते २६ डिसेंबरदरम्यान होणार अधिवेशन : स्वागताध्यक्ष म्हणून अशोक जैन तर ललित चौधरी स्वागत सचिव२ हजार विद्यार्थी होणार सहभागी

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.८,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या  ५२ व्या  प्रदेश अधिवेशनाचे आयोजन जळगावात २४ ते २६ डिसेंबर दरम्यान  शिवतीर्थ मैदानावर करण्यात आले आहे. अधिवेशनाची स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे. या स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून अशोक  जैन व सचिव ललित चौधरी यांची निवड करण्यात आल्याची माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अभाविपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी दिली.

यावेळी अभाविपचे मनिष जोशी, महानगराध्यक्ष भुषण राजपूत, अभाविप महानगरमंत्री विराज भामरे, सहकार भारतीचे दिलीप पाटील, संजय बिर्ला, सतिष मोरे यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी उपस्थीत होते.   हे अधिवेशन ‘संस्कार व रोजगार युक्त शिक्षण’ या विषयाला अनुसरून असणार असल्याचे डॉ.मुंढे यांनी सांगितले.

या प्रस्तावांवर होणार चर्चा१.अधिवेशनात शैक्षणिक, सामाजिकस्थिती , विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची सद्यस्थिती व उत्तर महाराष्ट्र स्थिती या विषयावर प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. सद्य घडामोडींवर प्रतिनिधींच्या माहितीसाठी काही विषयांवर समांतर सत्र असणार आहेत. यामध्ये जीएसटी, स्वदेशी असे विषय असतील व रोजगाराची सद्यस्थिती या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये तज्ञ लोकांना बोलवण्याचा मानस आहे.२. अधिवेशनात अ.भा.वि.प प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री यांची निवड होणार आहे. अधिवेशनासाठी उद्घाटक म्हणुन शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना बोलावले जाणार आहे व या सोबत महिला खेळाडू व सिनेसृष्टीतील व्यक्तीला बोलावण्याचा मानस असल्याचे डॉ.मुंढे म्हणाले.

२ हजार विद्यार्थी होणार सहभागीअधिवेशनासाठी महाराष्ट्र प्रांतातून २ हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. २५ डिसेंबर रोजी शोभा यात्रा असेल, या शोभा यात्रेचा समारोप एका जाहीर सभेत होईल. ज्यामध्ये महाराष्ट्रातुन आलेल्या काही विद्यार्थी नेत्यांचे महाराष्ट्राच्या सद्याच्या शैक्षणिक व सामाजिक विषयांना धरून भाषणे होतील. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे, ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राची लोक संस्कृती आणि  जनजाती संस्कृतीचे दर्शन होईल व अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अ.भा.वि.प महाराष्ट्राच्या अन्य पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्यांची निवड होईल. अशी माहिती डॉ. मुंढे  यांनी दिली.

अधिवेशन समिती गठीतसंपूर्ण अधिवेशनाची स्वागत समिती गठीत करण्यात आली आहे. या स्वागत समितीचे अध्यक्ष जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन  व सचिव ललित चौधरी हे असणार आहेत. कार्याध्यक्ष म्हणून डॉ. प्रताप जाधव, व्यवस्थानप्रमुख भानुदास येवलेकर असणार आहेत अशी घोषणा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.ज्ञानोबा मुंढे यांनी केली. या वेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वागतअध्यक्ष या पदाचा पदभार स्वीकारत असल्याचे सांगीतले. जळगाव शहरात वेगवेगळे अधिवेशन, चर्चासत्र, सेमिनार यासह विविध उपक्रम होत असतात. चांगल्या कायार्साठी शहरातील चांगली मंडळी एकत्रीत येते ते कार्य एखाद्या संस्थेचे नसून शहराचे असते यासाठी सर्वांनी या अधिवेशनासाठी सहकार्य करावे असे आवाहन स्वागत अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.