काही शेतकऱ्यांचे तीन, तर काही शेतकऱ्यांचे अडीच महिन्याचे पीक होत आल्याने रासायनिक खतांचे दोन डोस व तीन, चार कीटकनाशकांची फवारणी करून पीक जोमात वाढविले होते. २०-२५ कैऱ्या (बोंडे) परिपक्व झालेले आहेत, तर मध्यापासून वर शेंड्यापर्यंत जोमदार फूल, पाते लागलेली होती. चांगले उत्पन्नाचे स्वप्न बघत असताना गेल्या चार, पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू राहिल्याने ५० टक्के फूलपातीमध्ये बुरशी तयार होऊन या सर्व फूलपाती मोठ्या प्रमाणावर जमिनीवर पडून या चार, पाच दिवसांतच २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्या (कपाशी)चे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
पावसाने पुढे जर अशीच परिस्थिती लावून धरली, तर खालील परिपक्व झालेल्या कैऱ्या (बोंडे) अति पावसाने सडतील. अजून नुकसान होऊन जवळजवळ ५० ते ६० टक्के नुकसान होऊन शेतकऱ्यांना पांढरे सोने कपाशीमध्ये जबरदस्त फटका बसेल, अशी चिंता आतापासून सतावू लागली आहे.