जळगाव : जळगाव शहरात रविवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत, तर ११ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्या ११६ वर आली असून ग्रामीणमध्ये २ बाधित समोर आले आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दहापेक्षा कमी रुग्ण आहेत.
जिल्ह्यात रविवारी एकही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. शिवाय सारीचे मृत्यूही गेल्या अनेक दिवसांपासून थांबले असून यामुळेही मोठा दिलासा जिल्ह्याला मिळाला आहे. याआधी १९ फेब्रुवारीला एकही मृत्यू नव्हता. त्यानंतर मात्र २४ तासांत होणारे मृत्यू वाढले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मृत्यू घटले आहेत. रविवारी आरटीपीसीआरचे १६७१ अहवाल समोर आले असून त्यात केवळ ३ बाधित आढळून आले आहेत, तर अँटिजनच्या १३८६ जणांची तपासणी झाली असून त्यात ४५ जण बाधित आढळून आले आहेत.