शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव बसस्थानकातून ५ लाख ७५ हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:25 IST

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ठळक मुद्देकापसाचे अडीच लाख सुरक्षितकापसाचे पैसे घेतले जोशीपेठेतून

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २ - नवीन बसस्थानकावर पाचोरा येथे जाण्यासाठी एस.टी.बसची वाट पाहत बसलेले संजय विष्णु वाणी (वय-४५, रा़सातगाव डोंगरी, ता़ पाचोरा) यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार रूपये असलेले बॅग हिसकावून दुचाकीवरून दोन चोरट्यांनी धुम ठोकल्याची घटना शुक्रवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास घडली़दरम्यान, हातातील अडीच लाख रूपये असलेली बॅग मात्र सुखरूप राहिली़ रात्रीच वाणी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना हकीकत सांगताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले़ त्यात दोन जण भरधाव दुचाकीवरून जात असताना दिसून आले आहे़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कापूस विक्रीची होती रक्कमसंजय वाणी हे सातगाव डोंगरी येथे कुटुंबियांसह वास्तव्य करतात़ त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे़ मागील हंगामात वाणी यांच्यासह इतर तीन भावडांनी कापसाची लागवड केली होती. ३० मे रोजी संजय वाणी व त्यांचे भाऊ सुधाकर वाणी, बाबुलाल वाणी व पुतण्या अमित शेंडे या चौघांनी शेतातून निघालेला १२० क्विटंल कापूस हा ट्रक (एमएच़१९़झेड़५०५५) मध्ये भरला़ अन् तो गुजरात राज्यातील चोटीला या गावी विक्रीसाठी ज्वाली जिनींग येथे पाठविण्यात आला़ कापूस विक्री करुन वाल्मीक पाटील हा कर्मचारी घरी आला़ दोन दिवस बँका बंद असल्यामुळे जिनींग मालकाने वाल्मीक यास कापूस विक्रीचे पैसे दिले नाही़कापसाचे पैसे घेतले जोशीपेठेतूनसंजय वाणी यांनी कापसाचे पैसे हे रोख स्वरुपात जळगाव येथे पाठविण्यात यावे अशी विनंती जिनींग मालकास केली़ त्यानुसार शुक्रवारी शहरातील जोशी पेठेतील रजनीकांत शेठ (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी कापसाचे पैसे आले आहेत तुम्ही घेऊन जा असे संजय वाणी यांना संपर्क करून सांगितले़ त्यानुसार पैसे घेण्यासाठी वाणी हे सायंकाळी ६ वाजता जळगावात आले़ त्यानंतर रजनीकांत शेठ यांच्याकडून जाऊन त्यांनी ५ लाख ६१ हजार रूपये घेतले़ मात्र, त्यातून रजनीकांत यांनी त्यांचे कमीशनचे १२०० रूपये काढून उर्वरित रक्कम त्यांना दिली़चोरटे पैसे घेऊन पसार होताच वाणी यांनी क्षणाचा विलंब न करता जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले़ बसस्थानकावर घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती दिली़ दरम्यान, रात्री उशिरा एका संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते़ मात्र, त्याच्याकडून काही माहिती पोलिसांना मिळाली नाही़मित्राचीही घेतली रक्कमस्वत:च्या कापसाची रक्कम मिळाल्यानंतर गावातील मित्र शेतकरी गोविंद एकनाथ वाणी यांचे देखील पैसे जळगावातून घेणे होते़ त्यानुसार रात्री शहरातील नाथ प्लाझा येथे जाऊन त्यांनी पी़ नटवर यांच्याकडून गोविंद याचे अडीच लाख रूपये घेतले़ यानंतर एका बॅगेत अडीच तर दुसºया बॅगेत ५ लाख ६० हजार व त्यांचे स्वत:चे१५ हजार असे ५ लाख ७५ हजार रूपये घेऊन ते रेल्वेस्थानकाकडे निघाले़ मात्र, रेल्वे उशिरा असल्यामुळे रिक्षाने ते नवीन बस्थानकाकडे रवाना झाले़अन् क्षणातच लांबविली बॅगरात्री संजय वाणी हे नवीन बसस्थानकावर आले़ पाचोरा येथेजाण्यासाठीबस येण्यास उशिर असल्यामुळे ते बसची वाट पाहत फलाटावर बसले़ तोच रात्री साडे आठ वाजता एक तरूण त्यांच्याजवळ आला अन् क्षणातच त्याने ५ लाख ७५ हजार रूपये असलेली बॅग हिसकावत धूम ठोकली़ वाणी यांनी पाठलाग केला़ बाहेर दुचाकी घेऊन उभा असलेल्या साथीदारसोबतच चोरटा बॅग घेऊन पसार झाला़

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव