शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पालिकेतर्फे ५ मोफत वीज वाहने चार्जिंग केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 16:46 IST

प्रजासत्ताक दिनी ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत शहरात विजेवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी मोफत चार्जिंग करण्याचे ५ केंद्रे उभारण्यात येत आहे.

ठळक मुद्देअभिनव उपक्रम : प्रदूषण कमी करण्यासाठी विजेवर चालणारी वाहने वापरण्याचे आमदारांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : नगरपरिषदेतर्फे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत शहरात विजेवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी मोफत चार्जिंग करण्याचे ५ केंद्रे उभारण्यात येत असून एका केंद्राचे उदघाटन आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत ऊर्जा संवर्धनासाठी, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी विजेवर चालणारी वाहने वापरण्यास प्रवृत्त व्हावे, यासाठी शहरातील विविध चौकात ५ चार्जिंग केंद्रे लावण्यात येणार आहेत. एका केंद्राची किंमत दीड लाख रुपये आहे. मात्र विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांनी कमी खर्चात चार्जिंग केंद्र तयार केले असून एका केंद्रांवर २ वाहने चार्जिंग करण्यात येतील. एक वाहनासाठी सुमारे ४० मिनिटे लागणार आहेत. नागरिकांसाठी चार्जिंग व्यवस्था मोफत राहणार आहे. एकदा चार्जिंग केल्यावर वाहन ४० ते ५० किमी चालेल. त्यासाठी ४ ते ५ युनिट खर्च होतात. पालिकेने मोफत चार्जिंगची व्यवस्था केल्याने नागरिकांच्या खर्चात बचत होणार आहे. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी विजेची वाहने वापरण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी उपनगराध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे ,जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी प्रांताधिकारी सुनील सूर्यवंशी, डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील,नगरसेवक मनोज पाटील, प्रवीण जैन, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे हजर होते. सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरMuncipal Corporationनगर पालिका