शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील वैद्यकीय संकुलासाठी ४५८ कोटींचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:38 IST

सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया

ठळक मुद्दे‘टर्न की’ तत्वानुसार सा.बां. विभागाकडून होणार बांधकामसा.बां. विभागाकडून इ-टेंडरिंग प्रक्रिया होणार

जळगाव : चिंचोली शिवारात प्रस्तावित वैद्यकीय संकुलाच्या (‘मेडिकल हब’) पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांच्या रूग्णालयासह चार कामांसाठी ४५८ कोटी ८५ लाख ८९ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयात असून त्यास शासनाने मंजुरीदेखील दिली आहे. हे बांधकाम शासनाच्या १० मे २०१८च्या परिपत्रकानुसार ‘टर्न की’ तत्वाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधून घेतले जाणार आहे. या कामांसाठी बांधकाम सल्लाहार नेमण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २४ आॅक्टोबर रोजी निविदा देखील काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयाये आणि रुग्णालयांचे बांधकाम आता केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सार्वजनिक कंपन्यांकडून करुन घेता येणार असल्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. यामध्ये २५ कोटी व त्या पेक्षा जास्त अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांचाही समावेश राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने माहिती घेतली असता मुळातच हे काम ४५८ कोटींच्यावर असल्याने ही कामे मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार होणार असल्याचे सांगितले जात आहे.चिंचोली शिवारात प्रस्तावित वैद्यकीय संकुलाच्या (‘मेडिकल हब’) चा हा प्रकल्प सुमारे ८०० कोटींचा असून त्यासाठी १०० एकर जागा संपादित करण्यात आली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांचे रूग्णालय, मुले, मुली, परिचारिका वसतीगृह व डॉक्टर, कर्मचारी निवासस्थाने अशा इमारतींचे काम प्रस्तावित आहे. तर पुढील टप्प्यांमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व १०० खाटांचे रूग्णालय, शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालय या कामांचा समावेश आहे.यासाठी ४५८ कोटी ८५ लाख ८९ हजार रुपयांचे दोन वेगवेगळे अंदाजपत्रक असून २६६ कोटी ९५ लाख ६५ हजार रुपयांच्या अंदाजपत्राच्या कामांमध्ये महाविद्यालय, प्रशासकीय इमारत, निवासस्थाने, वसतिगृह या कामांचा समावेश आहे. तसेच १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपयांच्या अंदाजपत्रातील कामांमध्ये रुग्णालयाची इमारत उभा राहणार आहे.या शासकीय वैद्यकीय संकुलाची इमारत उभारणीसाठी बांधकाम सल्लागार नेमण्याची प्रक्रियादेखील सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण सा.बां. विभागाकडून इ-टेंडरिंग प्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.चिंचोली शिवारात वैद्यकीय संकुल उभारणीसाठी सल्लागार नेमणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच वैद्यकीय संकुलाचे बांधकाम शासकीय परिपत्रकानुसार ठरवून दिलेल्या संस्थेकडून होणार आहे.- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव