शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सर्वेक्षणात आढळल्या ४३७ गळत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 11:15 IST

२९५ कामे केली तातडीने पूर्ण

ठळक मुद्दे १४२ ठिकाणांहून अद्यापही होतेय पाण्याची नासाडी

जळगाव : शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने गळत्या व त्यातून होणारी पाण्याची नासाडी या विषयावर ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन शहरातील गळत्यांबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश होते. पाणी पुरवठा विभागाच्या विभाग कार्यालयांनी केलेल्या पाहणीत सुमारे ४३७ लहान मोठ्या गळत्या आढळून आल्या असून २९५ गळत्या बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र अद्यापही अनेक ठिकाणांहून पाण्याचा अपव्यय हा सुरूच असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.वाघूर धरणात यंदा जेमतेम पाणी साठा शिल्लक आहे. ही बाब लक्षात घेऊन शिल्लक असलेला साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने आरक्षित केला आहे. तसेच भविष्यात शहरास गंभीर अशा पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून तीन किंवा चार दिवसांआड पाणी पुरवठा केला जावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेस करण्यात आल्या आहेत.नागरिकांसाठी काटकसर पण गळत्यांमुळे पाणी अपव्ययनागरिकांसाठी पाण्याची कपात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर दुसरीकडे वाघूर धरणाच्या नजीक असलेल्या शेतांमधून शेकडो पंप लावून सुरू असलेली पाण्याची चोरी व वाघूर धरणापासून शहरापर्यंत येणाऱ्या पाईप लाईनवरील गळती तसेच शहरातील विविध भागातून जाणाºया पाईप लाईनरील गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असते. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी मनपा ज्या प्रमाणात पाणी उचलते त्यांच्या ३० टक्के पाणी हे रोज वाया जात असल्याचा मनपाचा अहवाल आहे. या व्यतिरिक्त शहरातील गळत्यांचा विचार केल्यास हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असल्याची भितीही व्यक्त केली जात आहे.पाण्याचा प्रचंड अपव्यय सुरूचशहरात पाणी पुरवठा विभागाचे ९ युनिट कार्यालय आहेत. या कार्यालयांना त्यांच्या क्षेत्रातील गळत्यांची महिना भरातील माहिती सादर करण्याचे आदेश होते. त्यानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरात ४३७ ठिकाणी लहान, मोठ्या गळत्या आढळून आल्याचे या अहवालात नमुद आहे. त्यापैकी २९५ गळत्या तातडीने बंद करण्यात आल्या असल्याचे कळविले असून १४२ गळत्या अद्यापही कायम असल्याचे या अहवालात म्हटले आहे.मनपा तसेच जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवरून ‘लोकमत’ने शहरात पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईन वरून होणाºया गळत्या व पाण्याचा होत असलेला अपव्यय याबाबत नागरिकांना आवाहन करून माहिती कळविण्याच्या सूचना केल्या होत्या. नागरिकांनी त्यास उस्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या भागातील गळत्यांची माहिती छायाचित्रासह पाठविली होती. या संदर्भात प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी पाणी पुरवठा विभागास शहरातील गळत्यांचे सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार शनिवारी हा अहवाल सादर करण्यात आला.