आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १३ : पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ११२ जागांसाठी पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. दुस-या दिवशी ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी ६६५ उमेदवार हजर राहिले तर १६३ उमेदवार गैरहजर राहिले. हजर असलेल्यांपैकी ६२४ पैकी शारीरीक चाचणीत पात्र ठरले तर ४१ उमेदवार छाती व उंची मोजमापमध्ये अपात्र ठरले. बुधवारी ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह अधिकारी वर्ग पहाटे साडे तीन वाजेपासून मैदानावर हजर होते. दरम्यान, उंची व छाती मोजमाप करताना उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्वत: या उमेदवारांची मोजमाप केली.असे आहेत जागांचे आरक्षणजिल्हा पोलीस दलातर्फे ११२ जागांसाठी ही भरती होत आहे. सर्व जागा खुल्या प्रवर्गातील असून त्यात सर्वसाधारण ३२, महिलांसाठी राखीव ३४, खेळाडू ६, प्रकल्पग्रस्त ६, भूकंपग्रस्त २, माजी सैनिक १७, अंशकालिन पदवीधर ६, पोलीस पाल्य ३ व गृहरक्षक दलासाठी ६ जागा राखीव आहेत.
जळगाव पोलीस भरतीत दुस-या दिवशी ४१ उमेदवार अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:15 IST
पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ११२ जागांसाठी पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. दुस-या दिवशी ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी ६६५ उमेदवार हजर राहिले तर १६३ उमेदवार गैरहजर राहिले. हजर असलेल्यांपैकी ६२४ पैकी शारीरीक चाचणीत पात्र ठरले तर ४१ उमेदवार छाती व उंची मोजमापमध्ये अपात्र ठरले.
जळगाव पोलीस भरतीत दुस-या दिवशी ४१ उमेदवार अपात्र
ठळक मुद्दे १६३ उमेदवार गैरहजर मोजमापबाबत उमेदवारांनी घेतला आक्षेप पोलीस अधीक्षकांनीच मोजली उंची