शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

लोकसभा निवडणुकीसाठी ४१ सीमा तपासणी नाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 11:10 IST

- विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे

ठळक मुद्देपाल येथे पोलीस दलाची बॉर्डर कॉन्फरन्स

जळगाव : लोकसभा निवडणुकीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचाली दोन राज्यातून होणारी विविध प्रकारची अवैध तस्करी रोखण्यासाठी मध्यप्रदेश व महाराष्टÑाच्या सिमेवर ४१ सीमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले असून हे सर्व नाके अधिक सक्षम करण्यासह निवडणुका निर्भयपणे पार पाडण्यासाठी यंत्रणेने अलर्ट रहावे असे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी मध्यप्रदेश व खान्देशातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पाल येथे वन विभागाच्या विश्रामगृहात महाराष्टÑ व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली.अध्यक्षस्थानी डॉ.छेरिंग दोरजे होते. यावेळी मध्यप्रदेशचे उपमहानिरीक्षक एम.एस. वर्मा, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, प्रशांत बच्छाव, धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, नंदूरबारचे पोलीस अधीक्षक संजय पाटील, मध्यप्रदेशातील खरगोनचे पोलीस अधीक्षक सुनीलकुमार पांडे, बडवानीच्या अपर पोलीस अधीक्षक सुनिता रावत व बºहाणपुरचे अधीक्षक अजयसिंग येथील पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही राज्यातील उपअधीक्षक व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील २७ गावे सिमेवरमध्यप्रदेश व महाराष्टÑाच्या सिमेवर जळगाव जिल्ह्यातील २७ गावे आहेत. त्यामुळे या गावांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन तेथेही सिमा तपासणी नाके तयार केले जाणार आहेत. बºहाणपूर खरगोन व बडवानी जिल्ह्यातील १६० पाहिंजे असलेले व १५६ फरार असलेले आरोपी जिल्हा पोलीस दलाच्या रेकॉर्डवर आहेत. हे आरोपी शोधून देण्यासाठी संबंधित पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घ्यावा.दरम्यान, दोन्ही राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा व्हाटसअ‍ॅप गृप तयार करुन रोज दैनंदिन गुन्ह्यांची माहिती एकमेकांना द्यावी त्यासह दोन्ही राज्यांच्या सिमेवर ४ वायरलेस यंत्रणा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.निवडणुका निर्भयपणे पार पाडालोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यसवस्था सुरळीत ठेवून भयमुक्त व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडाव्यात. त्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. त्यामुळे खान्देश व मध्य प्रदेश सिमा लगत पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या आरोपींची माहिती एकमेकांना देण्यात आली. त्याशिवाय पाहिजे व फरार असलेल्या आरोपींच्या माह्तिीचेही यावेळी देवाणघेवाण करण्यात आले. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून वेळेवर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई झाली पाहिजे असेही दोन्ही महानिरीक्षकांनी सांगितले.अवैध मद्य, शस्त्र व गांजावर नजरमहाराष्टÑ व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीत गैरवापरासाठी शस्त्र, अवैध मद्य, गांजा यांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सिमा तपासणी नाके अधिक सक्षम करुन प्रत्येक वाहनाची तपासणी झालीच पाहिजे, असेही यावेळी अधिकाºयांना बजावण्यात आले. रेल्वे व बस स्थानकावरही यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले.गुन्हेगारांची कुंडली तयार करण्याच्या सूचनामागील लोकसभा निवडणुकीत उपद्रवी ठरलेले तसेच या निवडणुकीत घातक ठरु पाहणाºया गुन्हेगारांची तसेच त्यांच्या पडद्यामागे राहून हालचाली करणाºयांची यादी आतापासूनच तयार करा व त्यांच्यावर असलेले गुन्हे व प्रकार पाहून अशा लोकांवर कोणत्या स्वरुपाची कारवाई करता येते याचे नियोजन करा. दोन्ही राज्यातील पोलीस अधीक्षकांसह प्रभारी अधिकाºयांनी समन्वय ठेवण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या.