जळगाव - शिवसेनेच्या युवतीसेनेसाठी सोमवारी जिल्हाभरात मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये जळगाव शहर व ग्रामीणसाठी ४०० युवतींनी मुलाखती दिल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली. युवतीसेनेच्या पदाधिकारीसाठी या मुलाखती घेण्यात आल्या. युवासेनेच्या कोअर कमिटीच्या सदस्या व मुंबई विद्यापीठाच्या सीनेटच्या सदस्या शितल देवरुखकर व युवासेनेचे संपर्क प्रमुख कुणाल दऱ्हाडे यांच्या उपस्थितीत सोमवारी या मुलाखती घेण्यात आल्या. जळगाव शहर व ग्रामीणच्या मुलाखती अजिंठा विश्रामगृह येथे घेण्यात आल्या. तर मंगळवारी देखील या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
काव्यरत्नावली ते आकाशवाणी दरम्यान पथदिवे वाढवा
जळगाव - शहरातील आकाशवाणी ते कव्यरत्नावली चौकादरम्यानच्या रस्त्यालगत पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अंधार असतो. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या रस्त्यादरम्यान असलेल्या विद्युत खांबाचा गॅप खुप मोठा असल्याने पथदिवे असतानाही अनेकदा अंधारच वाटतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने या रस्त्यादरम्यान ८० विद्युत खांब बसवून पथदिवे लावण्यात यावेत अशी मागणी नगसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी केली आहे. याबाबत महापौर भारती सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
बाजार फी बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांचे दप्तर जमा
जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार शुल्क बुडवणाऱ्या चार व्यापाऱ्यांच्या दुकानांचे दप्तर सोमवारी जमा करण्यात आले आहे. बाजार समिती प्रशासनाने ही कारवाई केली आहे. यामध्ये दाणाबाजार भागातील आडवाणी ट्रेडर्स, विजयकुमार ॲन्ड सन्स, रमणलाल ॲन्ड सन्स व विरेंद्रकुमार राजेंद्र या दुकानांचा समावेश आहे. बाजार समितीचे सचिव रमेश माळी, राजेंद्र ठाकरे, कैलास शिंदे, संभाजी पाटील, निवृत्ती राणे, दिलीप खडके, हर्षल नारखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
कापूस खरेदी केंद्र पडली ओस
जळगाव - जिल्ह्यातील जवळपास खासगी व शासकीय कापूस खरेदी केंद्र आता ओस पडली आहेत. जिल्ह्यात ९० टक्के कापूस खरेदी करण्यात आला असून, केवळ ठराविक शेतकऱ्यांनीच आपला माल अजून विक्रीसाठी आणलेला नाही. पणन महासंघाने देखील आता टप्प्याटप्प्याने आपली केंद्र बंद करण्यास सुरुवात केली आहे. तर सीसीआयच्या केंद्रावर देखील आता शुकशुकाट पहायला मिळत आहे.
शहराचा कमाल पारा ३५ अंशावर
जळगाव - थंडीचा कडाका आता कमी झाला असून, दिवसाच्या तापमानात आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी शहराचा कमाल पारा ३५ अंशावर पोहचल्याने आता उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात होणार आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली असून, पारा १५ अंशापर्यंत पोहचला आहे. मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यात पारा ३८ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आ