शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

४० विवाह निश्चित, चार घटस्फोटीतांचा फुलणार संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:10 IST

लेवा समाज मेळावा : विदेशातूनही समाज बांधवांची उपस्थितीत ५७० युवक-युवतींचा परिचय

जळगाव : लेवा समाजाच्यावतीने रविवारी आयोजित परिचय मेळाव्यात ४० युवक-युवतींच्या विवाहाबाबत सकारात्मक बोलणी झाली तर चार घटस्फोटीत युवतींचे विवाह जुळले़ ५७० युवक-युवतींनी परिचय दिला़ देशातूनच नव्हे परदेशातूनही युवक-युवती व त्यांचे पालक या मेळाव्यासाठी आले होते़ सकाळी दहा ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मेळावा सुरू होता़ साडे चार ते पाच हजार समाजबांधवांची यावेळी उपस्थिती होती़लेवा नवयुक संघातर्फे एकलव्य क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़ पी़ पाटील, भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील, महापौर सीमा भोळे, सरकारी वकील केतन ढाके, केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश पाटील, डॉ़ अर्जुन भंगाळे, विक्रीकर विभागाचे सहआयुक्त बी़ एऩ पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेविका गायत्री राणे, अनिल नारखेडे, उद्योजक सुनील बढे, लेवा नवयुक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, अनिल चौधरी,कीर्ती चौधरी, नितीन चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते़ सुत्रसंचालन प्रणिता झांबरे व नितीन नेमाडे यांनी केले़युवकांना स्वयंपाकाची आवड असल्यास प्राधान्य़़़एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या युवतीला प्राधान्य, अनुरूप, नोकरीस प्राधान्य अशा अपेक्षा युवकांनी व्यक्त केल्या तर युवकांप्रती ते अनुरूप, सुशिक्षित शिवाय स्वयंपाकाची आवड असल्यास प्राधान्य अशा काही अपेक्षा युवतींनी यावेळी व्यक्त केल्या़ सध्या लग्न जमविणे अवघड झाले आहे कारण एकमेकांप्रती अपेक्षा वाढल्या असून त्यात तडजोडी होत नसल्याने विवाह जमविणे अवघड असल्याचे या ठिकाणी एक बॅनरही लावले होते़...तर समाज व्यवस्था कोलमडेललेवा समाज हा सर्वत्र विखुरलेला समाज आहे़ मात्र, समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची घटती संख्या ही चिंताजनक असून ही संख्या घटत राहिल्यास समाज व्यवस्था कोलमडेल, त्यामुळे मुलींची संख्या वाढणे गरजेचे असल्याचे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले़ परिचय मेळावे हे गावागावापर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ एकत्रीत कुटुंबात राहायला नकार दिला जातो, त्यामुळे कळत -नकळत आपण कुटुंब व्यवस्थेवर आघात करीत असल्याचे ते म्हणाले.आॅनालाईन परिचयमेळाव्यासाठी अमेरिका, ब्राझील, दुबई, आॅस्ट्रेलिया या देशातील युवक-युवतीही आलेले होते़ यासह परदेशातील वीस ते पंचवीस युवक-युवतींनी या मेळाव्यात स्क्रीनवर आॅनलाईन परिचय करून दिला़ मंडपात दोन ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेल्या होत्या़ अतिशय शिस्तीत हा मेळावा पार पडला़ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन पुस्तक प्रकाशन करण्यात आले़

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव