शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणात ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:51 IST

८ लाख ५८ हजार लाभार्थ्यांना देणार गोवर व रुबेला लस

ठळक मुद्देपालकांच्या संमतीपत्राची आवश्यकता नाही पाच आठवड्यात लसीकरण करण्यात येणार

जळगाव : मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचे जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८ लाख ५७ हजार ८४८ लाभार्थी असून त्यांना पाच आठवड्यात लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या लाभार्थींप्ांैकी ६४ ते ६४ टक्के लाभार्थी हे शालेय विद्यार्थी असून त्यांना शाळेतच लसीकरण केले जाणार आहे. तसेच उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व बाहय लसीकरण सत्रात केले जाणार आहे. या लसीकरणासाठी पालकांच्या समंतीपत्राची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अत्यंत संक्रमक व घातक असलेल्या गोवर आजाराचे तसेच त्या मानाने सौम्य संक्रमक आणि मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींनादेखील होणा-या रुबेला या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींचा आढावा घेतला असता या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८ लाख ५७ हजार ८४८ लाभार्थी आहेत.या सर्व लाभार्थ्यांना ५ आठवड्यात लसीकरण करण्यात येणार आहे.एकूण लाभार्थ्यांपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे आहेत. त्यांना लस देण्यासाठी ३ हजार ३८० शाळांमध्ये एकूण ४३६६ लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य असून नंतरच्या २ आठवडयात अंगणवाडी केंद्र व बाह्य लसीकरणाचे ३०३३ सत्र, दुर्गम अति जोखमीचा भागामध्ये एकूण १३५ सत्र व २४८३ संस्थेतील सत्र असे एकूण जिल्ह्यातील १० हजार १७ सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.संमतीपत्राची आवश्यकता नाहीराज्यात काही ठिकाणी या लसीकरण मोहिमेसाठी पालकांकडून संमतीपत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या बाबत शहरातीलही आढावा घेतला असता शाळांकडून संमतीपत्र मागितले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच यासाठी संमतीपत्राची आवश्यकता नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेलाची लस द्यावी. ही लस पूर्णत: मोफत राहणार आहे. यासाठी पालकांच्या संमतीपत्राची आवश्यकता नाही.डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारीगोवर रुबेला लसीकरणासाठी पालकांची बैठक घेऊन त्यांना माहिती देण्यात आली आहे. मात्र संमतीपत्र आवश्यक नाही.- रेखा पाटील, मुख्याध्यापिका, गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यामंदिर

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव