शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

डांभुर्णीत १६ वर्षीय मुलाचा डोळे फोडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 8:39 PM

गुरुवारी झाला होता बेपत्ता

यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील १६ वर्षीय मुलाचे डोळे फोडून त्याच्या डोक्यावर विट मारून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आलीे. गुरूवारी सांयकाळपासून हा मुलगा बेपता होता. शुक्रवारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने डांभुर्णीत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.कैलास उर्फ बंटी चंद्रकांत कोळी असे या इयत्ता १० वी तील मुलाचे नाव असून तो गुरुवारी बेपता झाल्यावर रात्री व शुक्रवारी दिवसभर नातेवाईक व ग्रामस्थाच्या वतीने त्याचा शोध घेतला असता शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दत्तात्रय माणिक पाटील यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. कैलास हा एकुलता असून त्याने नुकतीच १० ची परीक्षा दिली असून त्याचा एका विषाचा पेपर बाकी आहे. त्याच्या पश्चात चार बहिणी, आई-वडील असा परीवार असून वडील मजुरी करतात.गुरूवारी सायंकाळी कैलास कोणासोबत गेला होता याची चर्चाही गावात उघड सुरू आहे. गेल्या वर्षी डांभुर्णीत अशाचप्रकारे एका बालकाच्या डोळयात काडया घालून त्याचे डोळे फोडण्यात आले होते. मात्र तो मुलगा दिर्घ उपचारांनतर बरा झाला होता.पो. नि. अरूण धनवडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते.