शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

38 गावांना हिवाळ्यातही पाणीटंचाई

By admin | Updated: February 3, 2017 00:45 IST

ओडीए योजना : सारोळा केंद्रात लाखो लीटर पाण्याची नासाडी, बोदवडला दहा दिवसानंतर पाणीपुरवठा

बोदवड : शहरासह बोदवड तालुक्यातील 38 गावांना उन्हाळ्याच्या पाणीटंचाईचे चटके हिवाळ्यात बसायला सुरुवात झाली आहे. बोदवड शहरातील  प्रभागांमध्ये  10 दिवस उलटले  तरी अजून  नळांना पाणी आले नसल्याची स्थिती सर्वच प्रभागात आहे. त्यामुळे हिवाळ्यातही पाणीटंचाईचा सामना शहर व तालुकावासीयांना करावा लागत आहे.बोदवड शहरासह तालुक्यातील 38 गावांची तहान ओडीएची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भागवत आहे. परंतु सन 2006 मध्ये कालबाह्य झालेली  ही  योजना अजूनही  अंतिम घटकेतही पाणीपुरवठा करीत आहे. या योजनेवरील पंपिंग करणारे तीन पंप आहेत. त्यापैकी दोन पंप अत्यंत जीर्ण झाल्याने बंद पडले होते. त्या ऐवजी अहमदाबाद येथील कंपनीकडून दोन पंप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून निधी मिळवून बसविण्यात आले आहेत. तर या तिन्ही पंपातून 24 तासात 1.22 (एम.एल.डी.) कोटी लीटर पाणी पंपातून म्हणजेच तासाला एक पंप तीन लाख 86 हजार लीटर पाणी उपसत असून ते साठवण टाकीर्पयत पोहचवले जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नव्याने  बसविण्यात आलेले दोन्ही पंप फक्त दोन लाख ते अडीच लाख लीटर पाणी शुद्ध  करीत असल्याने तासाला सुमारे 20 हजार लीटर पाणी (ओव्हर फ्लो) वाया जात आहे. नवीन पंपांच्या तुलनेत जुना 110 अश्वशक्तीचा पंप मात्र तीन लाख 86 हजार लीटर पाणी शुद्ध करीत आहे. गत आठवडय़ात नवीन पंपातील एका पंपात बिघाड झाल्याने पूर्ण  यंत्रणा बंद पडली होती तर आता पुन्हा पंप दुरुस्तीला  सुरुवात झाली आहे. पंरतु पूर्ण क्षमतेचे पाणी शुद्ध   होत नसल्याने पाणीपुरवठा होण्यास अडचण निर्माण होत  आहे. गळतीशिवाय  दिवसाकाठी पंप हाऊस केंद्रातूनच लाखो लीटर वाया जाणा:या पाण्यामुळे ऐन हिवाळ्यात ही अडचण निर्माण झाली आहे.एकंदरीत कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नवीन पंप क्षमतेपेक्षा जास्त पाणी फेकत नसल्याने बोदवड शहरासह 38 गावांना येणारा उन्हाळ्यार्पयत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.पाण्यासाठी : गृहिणींची वणवण.4बोदवडसह ग्रामीण भागाती रहिवाशांची थंडीच्या दिवसातही पाण्यासाठी वणवण होत आहे विशेष करुन गृहिणींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना ओडीएच्या सारोळा केंद्रात मात्र दररोज मोठय़ा प्रमाणावर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.क्षमतेपेक्षा कमी पाणी पपींग होत होते परंतु दुरूस्ती नंतर तीन लाख 86 हजार लीटर र्पयत पाणी आता उचल होत  आहे. अडचण सुटणार आहे. परंतु भविष्यात व उन्हाळय़ात पंपिगमध्ये बिघाड झाल्यास दोन पंप सुरळीत राहिल्यास अडचण येणार नाही मात्र दोन पंप बंद पडल्यास कंपनीचे  पथक व पंप आल्या शिवाय पंपिंगला अडचण ठरू शकते.- प्रवीण सोनवणे, वीजतंत्री सारोळा केंद्र