शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘३५ ट्रॅक्टर्स’चा जिल्हाधिकाऱ्यांना जोरदार झटका! आयुक्तांनी मागविला अहवाल : अनेक गंभीर बाबी उजेडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:32 IST

३५ ट्रॅक्टरच्या मदतीने अवैध वाळूउपसा होत  असताना टिपलेले छायाचित्र ‘लोकमत’ने १८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोईस्कर भूमिका घेणाऱ्या जिल्हा प्रशासनात खळबळ माजली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात गांभीर्याने दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना विभागीय आयुक्तांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या गिरणा पात्रातील बेसुमार वाळू उत्खननाच्या सचित्र वृत्ताचा धागा पकडत आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकांवर अनेक ठपकेदेखील ठेवले आहेत. गौण खनिजावरून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर बोट ठेवणारा हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

३५ ट्रॅक्टरच्या मदतीने अवैध वाळूउपसा होत  असताना टिपलेले छायाचित्र ‘लोकमत’ने १८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोईस्कर भूमिका घेणाऱ्या जिल्हा प्रशासनात खळबळ माजली होती. त्यानंतर छायाचित्रासह वृत्ताची विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे.  गतकाळात  केलेल्या कारवाया तसेच दंडात्मक वसुलीबाबतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात कार्यवाहीच्या प्रकरणात दिरंगाई झाली असून, त्यामुळे शासन महसुलाचे नुकसान झाल्याचा ठपकाही ठेवला आहे. या नुकसानीबाबतची उदासीनता तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे प्रशासनाची जनमानसात तयार होणारी नकारात्मक प्रतिमा गंभीर आहे, अशा शब्दांत आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

आयुक्तांकडे ३३ तक्रारीn या पत्रात आयुक्तांनी एक गंभीर बाब उजेडात आणली आहे. जळगाव जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी ३३ तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. n या तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम पूर्तता अहवाल आयुक्त कार्यालयास सादर केला नसल्याची बाबही उघड झाली आहे.

‘आव्हाणे’ने पेरले आव्हानआयुक्तांनी अतिशय शोधकपणे आव्हाणेचा मुद्दा टिपला आहे. जिल्ह्यात ८ वाळू गट आहेत. त्यात आव्हाणे गटाचा समावेश नाही. गिरणा पात्रात एकाचवेळी ३५ ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूउपसा सुरू आहे, हे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नाही, असे माझे मत झाले असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :sandवाळू