शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

३४ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कट

By admin | Updated: March 22, 2017 00:29 IST

उन्हाळ्यात टंचाईच्या झळा : एक कोटी १४ लाखांची थकबाकी, वीज कंपनीची धडक कारवाई

भुसावळ : ऐन उन्हाळ्यात भुसावळ तालुक्यातील तब्बल ३४ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा कट करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे़ मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने धडक कारवाई सुरू केली असून अजून काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा लवकरच कट करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले़दरम्यान, रणरणत्या उन्हाळ्याला प्रारंभ होताच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन कट करण्यात आल्याने ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे तर दुसरीकडे काही ग्रामपंचायतींनी तातडीने थकबाकी भरल्याने त्यांचा वीजपुरवठा कट करण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले़३४ ग्रा़पं़चा वीजपुरवठा कटवीज वितरण कंपनीकडे तब्बल  एक कोटी १४ लाखांची थकबाकी वाढल्याने वीज वितरण कंपनीने सोमवारी व मंगळवारी भुसावळ तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्यावरील वीजपुरवठा खंडित केला़ वीजपुरवठा कट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये भुसावळ तालुक्यातील सुनसगाव, गोजोरा, शिंदी, विचवे, मानमोडी, खंडाळा, मोंढाळा, सुरवाडे, बेलव्हाय, गोंभी, किन्ही, साकरी, वेल्हाळा, शिवपूर-कन्हाळा, कंडारी, मांडवेदिगर, मोहमांडली ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा कट करण्यात आला़नोटिसांना केराची टोपलीवीज वितरण कंपनीतर्फे थकबाकीपोटी संबंधित ग्रामपंचायतींना १५ दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र नोटिसा बजावल्यानंतरही संबंधित ग्रामपंचायतींनी दखल घेतली नाही तसेच थकबाकी भरण्यासंदर्भात कुठलीही सकारात्मकता न दर्शवल्याने वीज कंपनीने संबंधित ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश दिले़ भुसावळ तालुक्यासह बोदवड तालुक्यातील प्रत्येक सेक्शनचे आठ ते दहा कर्मचारी कारवाईत सहभागी झाले़ दरम्यान, वीज कनेक्शन कट झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत़ यांचा कारवाईत होता सहभाग४अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्ही़डी़नवघरे, ए़आऱआलेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता अजय पाटील, सेक्शन इन्चार्ज डी़आरक़ोल्हे, किरंगे, एस़एल़पवार, सोनवणे, एस़आऱनिकम, शेख, यादव, दलाल यांच्यासह कर्मचाºयांनी कारवाईत सहभाग नोंदवला़ या ग्रामपंचायतींना दिलासाथकबाकी लाखोंच्या घरात असली तरी तात्पुरती काही रक्कम भरल्याने काही ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन कट झाले नाही. त्यात फेकरी ग्रामपंचायतीने एक लाख ८० हजार तर साकेगाव ग्रा़पं़ने दोन लाख व वांजोळा-मिरगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीने ५० लाख रुपये तसेच कुºहेपानाचे ग्रामपंचायतीने थकबाकी भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही, असे सूत्रांनी सांगितले़