शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणुकीसाठी ३४ टक्के मतदान, पैसे वाटपाच्या प्रचंड तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 18:06 IST

महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले.

जळगाव - महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले. मतदानासाठी मतदारांना उमेदवारांनी पैसे वाटपाच्या प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्या. तर भुसावळ नगरपालिकेच्या बांधकाम समिती सभापतीच्या कारमध्ये पैसे आढळल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. दरम्यान, दुपारी ३.३० वाजेनंतर शहरातील अनेक केंद्रावंर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.बुधवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत  मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला.  दुपारी १.३० वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढू लागली. दुपारी ३ वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले होते. मनपा प्रशासनाने केलेल्या मतदान जागृती अभियानानुसार यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती. मात्र, दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी पाहता गेल्या निवडणुकीइतकीच मतदानाची सरासरी राहण्याची शक्यता आहे.आमदारांच्या भावाच्या कानशिलात लगावली प्रभाग १२ मधील भाजपाचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्यासाठी स्टेट बॅँक कॉलनी परिसरात पैसे वाटप करताना भुसावळ नगरपालिकेचे बांधकाम सभापती अमोल इंगळे यांची चारचाकी गाडी शिवसेनेचे उमेदवार नितीन बरडे यांच्या कार्यकर्त्यांनी पकडली. त्यानंतर भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे ही गाडी घेवून जाण्यासाठी आले असता बरडे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रमोद सावकारे यांच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी मध्यस्थी करुन हा वाद शांत केला. त्यानंतर पोलिसांनी ही गाडी जप्त केली.सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला९ पक्ष व अपक्ष असे एकूण ३०३ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. असे असले तरी खरा मुकाबला भाजपा व शिवसेना यांच्यात होत आहे. त्यासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मनपावर सुरेशदादा यांची एकहाती सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने भाजपाने मनपात कमळ फुलविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी गिरीश महाजन जळगावात ठाण मांडून होते.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक