जळगाव : अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या समाजातील ३३ आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़हा सोहळा बुधवारी सायंकाळी जगताप मंगल कार्यालयात पार पडला़ यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़अध्यक्षस्थानी मधुकर लोटन जगताप होते़ व्यासपीठावर ग़भ़तल्हार, मुकुंद मेटकर, विवेक जगताप, मनोज भांडारकर, सतीश जगताप, जगदीश जगताप, अंजली बाविस्कर, डॉ़ मनीषा जगताप, संजय बोरसे आदी उपस्थित होते़ प्रास्ताविक दत्तात्रय कापुरे यांनी केले़कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया शिंपी समाजातील आदर्श ३३ शिक्षक-शिक्षिकांचा शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ यावेळी आयोजकांनी मनोगत व्यक्त केले.असे आहेत सत्कारार्थी आदर्श शिक्षकडॉ़ मनीषा जगताप, अश्विनी खैरनार, संजय बोरसे, कैलास शिंपी, उखर्डू चव्हाण, रवींद्र संदानशिवे, राकेश शिंपी, भारती निकुंभ, प्रशांत गांगुर्डे, जानकी गाढे, दीपक शिंपी, पौर्णिमा शिंपी, संजय निकुं भ, महेश शिंपी, सुरेखा कापुरे, सुनीता शिंपी, माधुरी चव्हाण, दीपिका शिंपी, दीपाली शिंपी, जया शिंपी, ऋषीकेश शिंपी, प्रतिभा शिंपी, कामिनी शिंपी, प्रतिभा प्रशांत शिंपी, पल्लवी शिंपी, स्रेहा शिंपी, हर्षलता शिंपी, वैशाली जगताप, भावना शिंपी, माधुरी मेटकर, रेखा शिंपी तसेच ज्योती जगताप या समाजातील आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला़ सूत्रसंचालन मनोज भांडारकर यांनी केले तर आभार संजय जगताप यांनी मानले़ परेश जगताप, रामकृष्ण शिंपी, दिलीप भामरे, शिवदास शिंपी, शिवाजीराव शिंपी आदींनी परिश्रम घेतले़
जळगावात शिंपी समाजातील ३३ शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:47 IST
अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या समाजातील ३३ आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़
जळगावात शिंपी समाजातील ३३ शिक्षकांचा सत्कार
ठळक मुद्देशिक्षकांच्या शैक्षणिक कामगिरीची दखलसमाजातील मान्यवरांची उपस्थितीअखिल भारतीय अहिर शिंपी समाजाचा उपक्रम