आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ -जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेची दुसरी बैठक ९ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी ९ आमदारांनी एकूण ३३ प्रस्ताव पाठविले आहेत. त्यास या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.या परिषदेंतर्गत खानपट्टीधारक, वाळू ठेकेदार यांच्याकडून उपलब्ध स्थानिक निधीतून विधानसभा मतदार संघात विविध कामे केली जातात. त्यानुसार एक कोटी ६५ लाख ९४ हजार ७९३ रुपयांचा हा स्वामीत्व निधी उपलब्ध झाला आहे. यामधून जिल्ह्यात विविध कामे करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आमदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.मतदार संघातून आलेल्या प्रस्तावांची संख्याजळगाव शहर- ४, जळगाव ग्रामीण - ५, भुसावळ - ४, रावेर - ४, चोपडा - ४, मुक्ताईनगर - १, अमळनेर - ४, पाचोरा - ६, जामनेर - ०, चाळीसगाव - १, एरंडोल - ० असे एकूण ३३ प्रस्ताव परिषदेकडे आलेले आहेत.यामध्ये जामनेर व एरंडोल मतदारसंघातून एकही प्रस्ताव आलेला नाही.या प्रस्तावांमध्ये शाळामध्ये आर.ओ., फिल्टर बसविणे, स्वच्छतागृहांचे कामे, रस्ता कॉंक्रिटीकरण अशा कामांचा समावेश आहे.
जळगावात खनिज प्रतिष्ठान परिषदेंतर्गत ९ आमदारांकडून ३३ कामांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 12:35 IST
सोमवारी बैठक
जळगावात खनिज प्रतिष्ठान परिषदेंतर्गत ९ आमदारांकडून ३३ कामांचे प्रस्ताव
ठळक मुद्देएक कोटी ६५ लाखाचा निधीजामनेर व एरंडोल मतदारसंघातून एकही प्रस्ताव आलेला नाही