शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
4
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
5
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
6
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
7
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
8
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
9
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
10
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
11
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
12
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
13
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
14
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
15
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
16
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
17
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
18
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
19
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
20
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर शहरात ३१ विंधन विहिरींना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:55 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर शहरातील संभाव्य पाणीटंचाई दूर व्हावी या दृष्टिकोनातून ३१ ठिकाणी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील व मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी दिली.

ठळक मुद्देसंभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनानगरपंचायतीतर्फे प्रशासनाला प्रस्तावभूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षणनगरपंचायतीतर्फे ५० अश्वशक्तीच्या पंपाची दुरुस्ती

मुक्ताईनगर, जि.जळगाव : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर शहरातील संभाव्य पाणीटंचाई दूर व्हावी या दृष्टिकोनातून ३१ ठिकाणी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील व मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी दिली.नगरपंचायतीने २८ फेब्रुवारी रोजी ठराव केला होता व शहरातील संभाव्य पाणीटंचाईसंदर्भात विंधन विहिरींसाठी मंजुरी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्च महिन्यामध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानुसार भूजल सर्वेक्षण विभागाने मुक्ताईनगर शहरातील विविध ठिकाणी स्थळ निरीक्षण करून ३१ ठिकाणी विंधन विहिरी करण्याची शिफारस दिलेली आहे. त्यानुसार ३१ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली. यात आस्थानगरी, पंचायत समितीच्या मागे, आठवडे बाजार, आझाद मैदान, अलफलाह शाळेजवळ, अबूबकर यांच्या घराजवळ, आमिन खान यांच्या घराजवळ, शनि मंदिराजवळ, मटण मार्केटजवळ, भिलवाडीजवळील माळी डोंगरावर, आजम टेलर यांच्या दुकानाजवळ, हनीफ मन्यार यांच्या घराजवळ, शब्बीर खाटीक यांच्या घराशेजारी, इस्लामपुरा मदसा परिसर, खुशतर नबाब यांच्या घराजवळ, शब्बीर दलाल यांच्या घराजवळ, बशीत कुरेशी यांच्या घराजवळ, रहमान खान यांच्या घराजवळ, रफिक ताज महंमद यांच्या घरासमोर, भास्कर लवांडे यांच्या घराजवळ, सुभाष देशमुख यांच्या घराजवळ, अष्टविनायक कॉलनीत पुनर्वसन टप्पा तीन, लेवा समाज मंदिरासमोर, दत्तू सोनार यांच्या घराजवळ, शंकर पाटील यांच्या घराजवळ, हनुमान मंदिरासमोर, एन.आर.पाटील यांच्या घराजवळ, प्रवीण पाटील यांच्या घराजवळ, तसेच राम राणे व विजय भंगाळे यांच्या घराजवळ या विंधन विहिरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत.अध्यादेशाद्वारे आचारसंहिता शिथील झाल्यानंतर नगरपंचायतीने उपअभियंता, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद जळगाव यांच्या नवीन विहीर करण्याच्या तंत्रानुसार लवकरच या विंधन विहिरी शहरात करण्यात येणार आहे. नगरपंचायतीने ५० अश्वशक्तीच्या पंपाची दुरुस्ती तसेच लिकेज दुरुस्ती तत्काळ केलेली आहे. नागरिकांनीदेखील पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करून पंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी निविदा मागवली होती. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आचारसहितेनंतर पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर