शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

डांगरी विकास सोसायटीत ५४ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:11 IST

अमळनेर : तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत तत्कालीन संचालकांसह इतरांनी ५४ लाख ६६ हजार ४६० ...

अमळनेर : तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत तत्कालीन संचालकांसह इतरांनी ५४ लाख ६६ हजार ४६० रुपयांचा संगनमताने अपहार केला. या प्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.२३ जुलै रोजी जळगाव येथील सहकारी संस्थेचे (पणन) वर्ग एकचे विशेष लेखा परीक्षक अनिल गंगाराम पाटील, रा.जळगाव यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. सन २०१३ ते २०१८ दरम्यान संचालकासह सचिव, चेअरमन, कर्मचारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक व क्षेत्रीय अधिकारी यांनी संगनमताने मिळून पदाचा दुरुपयोग केला.यावरून संस्थेचे तत्कालीन सचिव मोहनकुमार गंगाधर पवार, चेअरमन अनिल शिसोद, रामकृष्ण पाटील, संगीताबाई शिसोदे, अंतरावर शिसोदे, गुलाबराव शिसोदे, उदय शिसोदे, बाळासाहेब शिसोदे, वसंतराव व्ही. पाटील, शालीक पाटील, नामदेव वानखेडे, रमेश बोरसे, संतोष भोई (मयत), अशोक पाटील, देवका भोई, उदय पाटील, श्रावण भोई, छगन पाटील, अरुण शिसोदे, भाईदास पाटील, प्रशांत कुमावत, मीना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निर्मला चौतमन, कमलाकर शिसोदे, दिनकर देसल, गुलाबराव पाटील, जयराम पाटील, किशोर पवार या सर्व ३० आरोपींविरोधात संगनमताने गैरव्यवहार करून अपहार केल्याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला करीत या प्रकाराने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.विकास सोसायटीत अपहार प्रकरणी तत्कालीन सचिवाने केलेला गैरव्यवहार माझ्या लक्षात आला. याबाबत मी तक्रार तसेच चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सहायक निबंधक यांच्याकडे केली होती. या गैरव्यवहारास सचिव व जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक, क्षेत्रीय अधिकारी जबाबदार आहेत. मात्र आमच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता चौकशीअंती सत्य समोर येईलच.-अनिल शिसोदे, तत्कालीन चेअरमन, विकास सोसायटी, प्रगणे डांगरी