शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील २८ 'बुलेट राजां'ना पोलिसांचा चाप!

By विलास.बारी | Updated: April 7, 2023 17:06 IST

जळगावातील २८ बुलेट चालकांना पोलिसांनी चोप दिला. 

जळगाव: फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेट आणि ट्रीपलसीट, फॅन्सी नंबर प्लेटद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. शहर वाहतूक शाखेने दादा, काका, राजे, अण्णा, मामांना (फॅन्सी नंबर प्लेट) कारवाईतून जोरदार झटका दिला. त्याशिवाय कर्णकर्कश २८ सायलेन्सर जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर रोडरोलर फिरवून ते नष्ट  केले जाणार आहे.

बुलेटचा सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिली आहे. त्यानुसार काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई सुरू केली. त्यात २८ बुलेटधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई झाली. एवढेच नव्हे तर ट्रीपलसीट, विना क्रमांक नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणा-यांवर सुध्दा वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  नवीन सायलन्सर आणा...वाहतूक शाखेतच बसवा...अन् दंड भरून निघा...ज्या बुलेट राजांनी सायलेन्सरमध्ये बदल केले आहे. अशा वाहनधारकांचे वाहन पकडून त्यांचे वाहन शहर वाहतूक कार्यालयामध्ये नेले जाते. नंतर संबंधित वाहन मालकाला नियमानुसार असलेले नवीन सायलन्सर आणून ते तिथेच बसविण्यास सांगून मॉडिफाइड सायलेन्सर शहर वाहतूक शाखेत जमा केले जाते. जमा झालेले सायलेन्सर बुलडोझर खाली चक्काचूर केले जाणार आहेत. तसेच काही वाहनधारक नियमाप्रमाणे नंबर प्लेट न लावता फॅन्सी नंबर प्लेट लावल्याचे आढळले. अशा अनधिकृत नंबर प्लेट्स वाहनचालकांवर कारवाई झाली आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस