शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जळगावात इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला २७ कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 12:31 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठनिवेदन देण्यासाठी २० मिनिटांची प्रतीक्षा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - इंधन दरवाढीच्या विरोधात शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आंदोलन करण्यात येऊन सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात फक्त २७ पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसून आले. नंतर निवेदन देताना यात थोडी भर पडली.पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने याची झळ सामान्य जनतेला सहन करावी लागत आहे. त्या विरोधात शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस डी.जी. पाटील,महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, महानगरचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.हाती सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन तर काही जणांनी महागाई दर्शविणाºया फलकांचा कोट परिधान करून आंदोलनात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर येऊन सर्वांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, इंधनाचे दर दररोज बदलत असल्याने ते लक्षात येत नाही, मात्र सरकार यात सातत्याने वाढ करीत असून ही छुपी वाढ असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यात इंधनाच्या दरात तफावत असल्याचेही म्हटले आहे.आंदोलनाकडे पाठइंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील हेदेखील सहभागी नव्हते. त्यांच्या वडिलांची प्रकृती ठिक नसल्याचे कार्यकर्त्यांच्यावतीने सांगण्यात आले. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त निवेदनावर नाव असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस शिरीष चौधरी, अ‍ॅड. ललिता पाटील हेदेखील आंदोलनात सहभागी नव्हते. इतकेच नव्हे तर अगोदर केवळ २७ पदाधिकारी व कार्यकर्ते होते, नंतर काही जण आल्याने ही संख्या ३५ पर्यंत पोहचली.निवेदन देण्यासाठी २० मिनिटांची प्रतीक्षाआंदोलक निवेदन देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे दालनात नसल्याचे समजले. निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या दालनात गेले असता तेदेखील जेवणासाठी घरी गेल्याचे समजले. त्यामुळे निवेदन स्वीकारण्यास अधिकारी नसल्याने २० मिनिटे आंदोलक बसून होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी अधिकाºयांना संपर्क साधत त्यांना आंदोलनाबाबत कळविले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील आले व त्यांनी निवेदन स्वीकारले.वडिलांची प्रकृती ठिक नसल्याने आजच्या आंदोलनात सहभागी होता आले नाही. मात्र या बाबत सर्वांना सूचना देऊन आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.- अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव