शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

२५० लोककलावंतांची पंढरी : नगरदेवळे नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:32 IST

‘देवळांचे नगर’ असा धार्मिक इतिहास असलेले जळगाव जिल्ह्यातीील नगरदेवळे (ता.पाचोरा) हे गाव आपल्याला यादव काळाच्या अगोदर घेऊन जाते़ या गावात दोन तर परिसरात संगमेश्वर दिघी व वाघळी अशी अधिक मंदिरे आहेत़ प्रत्यक्ष गावात ३५० पेक्षा अधिक मंदिरे व दर्गाह आहेत़ धार्मिकदृष्ट्या हे गाव जसे महत्वाचे मानले जाते तशी या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आहे़ अशा या नगरदेवळ्यात अडीचशेवर लोकलावंत होऊन गेले. याविषयी लिहिताहेत एस.के.पवार विद्यालयाचे शिक्षक संजीव बावस्कर.

देशाला स्वातंत्र्य मिळाले. संस्थाने खालसा झाली़ नगरदेवळ्याची जहागिरी मुंबई सरकारने १९५३ सरकार जमा केली़ लोककलावंतांचा राजाश्रय संपला़ स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर जनजागृतीसाठी लोककला पथकाची स्थापना करण्यात आली़ शाहीर रामचंद्र जोशी यांनी गावातील कुलकर्णी अप्पा, जाधवसिंग परदेशी, तुकाराम बोरसे जगन चौधरी, रजेसिंग अण्णा, विठ्ठल ठाकूर लक्ष्मण धोबी, गोसावी बुवा, भागचंद गोंधळी, इ़ लोककलावंतांना सोबत घेऊन १९४२ च्या चळवळीत जनजागृतीचे काम केले़ यांचे लोककला पथक खूप प्रसिद्धीला आले़कालांतराने एक मुलगा आपल्या खर्ड्या आवाजात स्वरचित रचना सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होता़ त्याच्या आवाजाची उंची जबरदस्त होती़ काकांनी या मुलाला आपल्या कलापथकात सामिल करून घेतले़ आपल्या बुलंद व स्वरचित कवनाने या तरूणाने लोकांना झपाटून टाकले़ त्यांचे कलापथक त्या काळात चांगलेच नावारूपाला आले़ त्या लोककलावंतांचे नाव होते शाहीर शिवाजीराव पाटील़ त्यांच्या आवाजाची धाटणीच वेगळी़ उपजत प्रतिमा शक्तीमुळे इतरांच्या रचना न गाता स्वरचित रचनांना त्यांनी प्राधान्य दिले़ आज महाराष्ट्रात अनेक शाहीर आहेत़ परंतु स्वरचित रचना सादर करणारे खूप कमी आहेत़ त्यात शाहीर शिवाजीराव पाटलांचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते़शाहीर शिवाजीरावांनी शाहिरी स्वत: पुरती मर्यादित न ठेवता लोकाभिमुख केली़ त्यांनी वेगवेगळ्या विषयांना हात घातला़ समाजात असलेली निरक्षरता जातीय, विद्वेष, पर्यावरण, ºहास, शेतकरी आत्महत्या, हुंडा पद्धती इ़ अनेक समस्यांवर त्यांची लेखणी सफाईदारपणे फिरली़ पोवाडा, लोकगीत, भारूड, या लोककला प्रकारांच्या खुबीने वापर करत त्यांनी समाजाच्या समस्यांना वाचा फोडली़ त्यांच्या पथकात नामदेव सोन्नी व रामसिंग राजपूत हे स्त्रीपात्र भूमिका संवाद व अभिनयाने प्रेक्षकांची करमणूक अगदी सहजपणे सादर करून ते प्रेक्षकांना आकर्षित करतात़ (क्रमश:)-संजीव बावस्कर, नगरदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यPachoraपाचोरा