शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

अपहार प्रकरणी चेअरमन व संचालकांसह २३ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 16:12 IST

न्यायालयाचा आदेश : चोपडा सूतगिरणीबाबतची तक्रार

जळगाव : चोपडा येथील पंचायत समिती सदस्य तथा चोपडा सूतगिरणी संचालक भरत विठ्ठल बाविस्कर यांच्या तक्रारदारीनुसार अखेर चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये सूतगिरणीचे चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील, व्हाईस चेअरमन प्रभाकर भिमराव पाटील यांच्यासह संचालक मंडळ व व्यवस्थापक, सचिव व इतर अधिकारी अशा तेवीस जणांविरोधात २७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुतगिरणीचे संचालक भरत बाविस्कर यांनी स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केलेला होता. मात्र त्यानी सहकार क्षेत्राच्या नियमानुसार कारवाई होईल असे सांगून अर्जाची दखल घेतली नाही. यामुळे भरत बाविस्कर यांनी न्याय मिळविण्यासाठी चोपडा येथील न्यायालयात गुन्हा दाखल करणे संदर्भात याचिका दाखल केलेली होती.या याचिकेवर निकाल देत चोपडा येथील न्यायालयाने १० मे रोजी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यामुळे गुन्हा केव्हा दाखल होतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.चेअरमनसह संचालक, तज्ञ संचालक, सचिव, व्यवस्थापक आणि अकाउंटंट यांनी स्वत:च्या फायद्यासाठी आपसात पूर्व कट कारस्थान रचून चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीमध्ये २०१६ -१७ यावर्षी स्टेशनरी खर्च, प्रवास खर्च, संचालक प्रवास खर्च, पोस्टेज कुरियर खर्च, जाहिरात खर्च, आॅफिसरचा सल्लागार फी, टेलिफोन बिल या शीर्षकाखाली खोटे व बनावट दस्त तयार केला. तसेच याबाबतचे प्रोसिडिंग लिहून ते खरे असल्याचे भासवून सूतगिरणीचे सर्व सभासदांचा विश्वास विश्वास संपादन करून वेळोवेळी खर्च मंजूर करून घेतला व प्रत्यक्ष त्या रकमा खर्च न करता पुढील वर्षाच्या आर्थिक वर्षात सुतगिरणीच्या दुसºया टप्प्याचे बांधकाम मटेरियल खरेदी विक्री दस्ताऐवजात खाडाखोड करून केलेला बदल, वाळू खरेदी प्रकरण, निविदा न काढता व्यवहार करणे, अशा अनेक प्रकारात अपहार करून सर्व संशयितांनी संगनमताने स्वत:चा लाभ करण्याचा तसेच फसवणूक करण्याचा हेतू ठेवून २६ व्या अहवालात २०१६-१७ याकाळात कमी जास्त खर्च या सदराखाली बनावट हिशोब खरा असल्याचे भासवून १ कोटी १९ लक्ष २१ २७ रुपयांचा अपहार केला व सदस्यांची आणि शासनाची फसवूणक केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.यांच्या विरुद्ध झाला गुन्हा दाखलचोपडा शेतकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील , व्हा चेअरमन प्रभाकर पाटील, संचालक कालिदास सुमन चौधरी, माधवराव उत्तम पाटील, भागवत शंकर पाटील, प्रकाश पंडितराव रजाळे, रवींद्र दिनकर पाटील, तुकाराम राजधर पाटील, दिगंबर हिलाल पाटील, रामदास एकनाथ चौधरी, राजेंद्र भास्कर पाटील, जितेंद्र काशिनाथ पाटील, भालेराव जिजाबराव पाटील, शशिकांत शांताराम पाटील, राहुल मच्छिंद्र बाविस्कर, समाधान बापूसाहेब पाटील, रंजना श्रीकांत नेवे, जागृती संजय बोरसे, तज्ञ संचालक अशोक दौलत पाटील, सुनील तिलोकचंद जैन सुतगिरणी व्यवस्थापक मितेश महाजन सचिव पंढरीनाथ दंगल पाटील आणि अकाऊंटंट सुकुमार काळे यांच्याविरोधात कलम ४०५, ४०६, ४०८,४०९, ४१८, ४२०, १२० ( ब), ४६३, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक पांडुरंग लोकरे हे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी