जळगाव : भाजप जिल्हा व महानगरपालिकातर्फे सेवा समर्पण, अभियानांतर्गत कोरोना लसीकरण मोहीम १७ सप्टेंबरला राबविण्यात आली. यात पहिला आणि दुसरा डोस मोफत देण्यात आला. यामध्ये २२७१ जणांनी लस घेतली.
सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे सकाळी नऊ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी भाजप गटनेते भगत बालाणी, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, सेवा अभियान प्रमुख राहुल वाघ, महेश चौधरी, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. धर्मेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.