शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या एकूण चाचण्यांपैकी २२ टक्के बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:26 IST

रॅपीडमुळे गाठला दीड लाखांचा टप्पा : अजूनही ४ हजार चाचण्या कमी

जळगाव : गावागावात, गल्ली गल्लीत कोरोनाच्या रॅपीड अ‍ॅण्टीजन टेस्ट होत असल्या तरी हे प्रमाण राज्याच्या चाचण्यांच्या तुलनेत चार हजार चाचण्यांनी कमी आहे़ जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत विचार केला तर ३ टक्क््यांपर्यंत लोकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत व जेवढ्या चाचण्या झाल्या त्यांत २२ टक्के लोक बाधित आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण सद्यस्थितीत २२ टक्के असल्याचा निष्कर्ष काढता येतो़ अधिकांश चाचण्या होण्याची गरज असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ झपाट्याने होत असताना चाचण्यांची संख्या मात्र, अत्यंत कमी होती़ अतिजोखीमीचे संपर्क व कमी जोखीमीचे संपर्क पाहिजे त्या प्रमाणात तपासले जात नव्हते़ त्यामुळे रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात दाखल होत होते व मृत्यूचे प्रमाणही मंध्यतरीच्या काळात प्रचंड वाढले होते़ यावर केंद्रीय समितीनेही आक्षेप नोंदविला होता़ त्यानंतर जुलै महिन्यात रॅपीड अ‍ॅन्टीजन चाचण्यांना सुरूवात करण्यात आली व त्यानंतर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली़ जेथे दिवसाला तीनशे ते चारशे चाचण्या होत होत्या़ तेथे चार ते पाच हजारांवर चाचण्या केल्या जात आहे़ रोज येणाऱ्या अहवालांचे प्रमाणही वाढले आहे़ मात्र, सद्यस्थितीत ते पुरेसे नसून वाढलेले संसर्ग बघता चाचण्यांचे प्रमाण अधिक वाढविणे गरजेचे असल्याचे चित्र आहे़ चाचण्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आढळून येणाºया पहिल्या दहा जिल्ह्यात जळगावचा समावेश झाला होता़ त्यावेळी चाचण्यांचे प्रमाण वाढविणे व ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवणे अशा काही सूचना या जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत़ अशा स्थितीत चाचण्यांचे प्रमाण अधिक वाढविणे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे़ मात्र, गेल्या पाच महिन्यातील विचार केला असताना जळगाव जिल्हा दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांच्या बाबतीत राज्यापेक्षा सहा हजार चाचण्यांनी मागे होता़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव